कर्नाटकातुन परत येत असताना पिंपरखेडच्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू .
– डोंगरचा राजा / आँनलाईन
– सोलापूर जवळ झाला ट्रॅक्टरला अपघात.
वडवणी – चार महीने कर्नाटक राज्यात ऊस तोडणीचे काम करून कारखानाचा पट्टा पडल्यानंतर परत आपल्या गावाकडे ट्रॅक्टर मध्ये बसून निघालेल्या ऊसतोड मजुराचा ट्रॅक्टर वरून पडून सोलापूर जवळ अपघात झाला. या अपघातात सदर ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाला. संदिपान अर्जुनराव साबळे असे या 43 वर्षीय ऊसतोड मजुराचे नाव होते वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील ते रहिवासी होते.
वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी असलेले संदिपान अर्जुनराव साबळे हे ऊसतोड मजूर आपल्या पत्नीसह कर्नाटक राज्यामध्ये मागील चार महिन्यापूर्वी ऊस तोडणीसाठी गेले होते. मागील चार महिने त्यांनी ऊस तोडणीचे काम केले. कर्नाटक राज्यातील कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर ते आपल्या गावाकडे ट्रॅक्टर मध्ये बसून निघाले होते. त्यांचे ट्रॅक्टर सोलापूर जवळ आले असता त्यांच्या ट्रॅक्टर च्या समोर बसलेले संदिपान साबळे हे खाली पडले व जखमी झाले. सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये यांना तत्काळ देण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पिंपरखेड येथील एम डी एलचे संपादक ओम प्रकाश साबळे यांचे ते मोठे बंधू होते. संदीपान साबळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आई वडील, भाऊ असा परिवार आहे. चौकट. कुटुंब उघड्यावर ; .. संदिपान साबळे हे अत्यंत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील होते. राहायला घर नाही. केवळ एक एकर जमीनीवर या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेती पिकत नसल्यामुळे ते यावर्षी कारखान्याला गेले होते. कर्जाचा बोजा फेडावा या उद्देशाने कारखान्याला गेलेल्या संदिपान साबळे यांच्यावर काळाने घाला घातल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.तरी ऊसतोड कामगार संघटना,लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची आज मित्तीस गरज आहे.