Home » रोटरीचा उपक्रम.. सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास.

रोटरीचा उपक्रम.. सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास.

रोटरीचा उपक्रम.. सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास.

डोंगरचा राजा / आँनलाईन

– विश्वसुंदरी डॉ.नमिता कोहक कर्करोगाचा जीवनातील संघर्ष प्रबोधनातून मांडणार.

वडवणी – रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने दि.२८ मंगळवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता रेणुकामाता संस्थान वडवणी याठिकाणी कर्करोगाविषयी समाजप्रबोधनाच्या “सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विश्वसुंदरी डॉ.नमिता कोहक या स्वतःच्या जीवनातील कर्करोगाशी केलेला अविट संघर्ष स्वतः प्रबोधनातून व्यक्त करणार आहेत. तरी याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून या सामाजिक प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने विविध समाज विधायक अशा सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्यामधून विधायक सामाजिक बांधिलकी जोपासली जावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने हे कार्यक्रम राबविले जातात. नुकताच साजरा करण्यात आलेल्या मकरसंक्राती या सणानिमित्त महिला भगिनी सह सर्वांनाच एक वैचारिक व प्रेरणादायी समाज प्रबोधनाचा वान घेता यावा या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने दिनांक २८ जानेवारी २०२० मंगळवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता रेणुकामाता संस्थान चिंचवण रोड वडवणी याठिकाणी हळदी-कुंकू निमित्त कर्करोग जनजागृती मार्गदर्शनपर “सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास” या बहुआयामी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील डॉ.नमिता परितोष कोहक या विश्वसुंदरी उपस्थित राहून स्वतःच्या जीवनातील त्यांनी कर्करोगाशी केलेला अविट संघर्ष त्या स्वतःच्या शब्दातून उपस्थितांसमोर मांडणार आहेत. डाॅ.नमिता कोहक ह्या जग प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून त्यांनी आतापर्यंत विश्वसुंदरी मिसेस ग्लोबल यूनाइटेड २०१७, मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड क्वीन होंगकोंग, मिसेस इंडिया फोटोजेनिक २०१५ असे विविध किताब स्वतःच्या जिद्दीवर व बळावर प्राप्त केले आहेत. तरी या अभिनव समाजप्रबोधन कार्यक्रमास महिला भगिनी सह सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष रो.डाॅ.रवींद्र मुंडे, सचिव रो.संतोष गोंडे यांसह रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.