Home » महाराष्ट्र माझा » 13 लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट !

13 लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट !

13 लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट !

 

लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी कारखाना लिमटेड सुंदरनगर तेलगाव,ऊस गळीत हंगाम शुभारंभ ह.भ.प एकनाथ महाराज माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

 

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबईच्या संचालक पदी निवड झाली त्याबद्दल कारखाना आणि सर्वांच्या वतीने सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो.13 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन नियोजन केले आहे.5 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती आणि साडे सात कोटी युनिट कोजनरेशन प्लांट मधून निर्माण केले जाईल.कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला गेला,जून मध्ये हंगाम संपला अगदी थोडे दिवस हातात असताना गाळप क्षमता वाढवण्यासाठी कमी वेळ मिळालेला असताना अधिकारी,इंजिनिअर,कामगार या सर्वानी अथक परिश्रम घेतले.

 

मागील वर्षीचा हंगाम विक्रमी उत्पादन करणारा ठरला.यावर्षी त्यापेक्षा जास्त उत्पादन अधिक चांगली गुणवत्ता(रिकव्हरी) निश्चित होईल.असा विश्वास यावेळी व्यक्त केला.ऊस हे आपले प्रमुख आणि हमीचे उत्पादन देणारे पीक आहे.शेतकरी,ऊसतोड कामगार,वाहतूकदार,कर्मचारी व सर्व संचालक मंडळी यांच्या दृष्टीने आजचा दिवस सर्वांसाठी महत्वाचा आहे.

 

केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांचा लाभ किंवा तोटा कारखान्याला होतो.केंद्र सरकारने ठरवलेले नवीन साखर निर्यात धोरण महाराष्ट्राच्या हिताला बाधा ठरणारे आहे.

 

या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमा दरम्यान पहिली बैलगाडी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा स्वागत करून सन्मान केला.शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कारखान्याने ठेव योजना सुरू केली आहे यातून शेतकऱ्यांना आकर्षक व्याज दिले जाईल असे आवाहन ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्या दरम्यान केले होते त्याला प्रतिसाद देत अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ठेवी ठेवण्यास सुरुवात केली याचा मनस्वी आनंद आहे.

 

Prakash solanke