Home » माझा बीड जिल्हा » जिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..

जिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..

जिल्हा कारागृहातील कैद्यांना १०० पुस्तकं भेट देणार..

– डोंगरचा राजा / आँनलाईन 

रोटरी क्लब बीड कैद्यासाठी स्वछ पिण्याच्या पाण्याची सोय करणार 

बीड : रोटरी क्लब ऑफ बीड आणि माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान, देवडी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना वाचण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १०० पुस्तकांची भेट देण्यात येणार आहे.. तसेच रोटरी क्लबच्या वतीने कैद्यांसाठी पिण्यासाठी शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.. रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी कल्याण कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.. सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा कारागृहात हा कार्यक्रम होत आहे..

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते कारागृहाला ही पुस्तक भेट देण्यात येणार आहे.. जिल्हा कारागृह अधीक्षक विलास भोईटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.. जिल्हा कारागृहात हा कार्यक्रम होत असल्याचा माहिती रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी आणि माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान देवडी चे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.. ..

देवडी येथील सरपंच तथा स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांना वाचनाची प्रचंड आवड होती.. त्यांनी समाजिक, धार्मिक, वैचारिक असे अनेक ग्रंथ जमा केले होते.. माझ्या पश्चात ही पुस्तकं जनतेला उपलब्ध करून द्यावीत अशी

त्यांची इच्छा होती.. त्यानुसार त्यांच्या ग्रंथ संपदेतील १०० पुस्तकं जिल्हा कारागृहातील कैदयाना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले.

पुस्तकामध्ये धार्मिक, सामाजिक, वैचारिक पुस्तकांबरोबरच काही चरित्रग्रंथांचा देखील समावेश आहे..

रोटरीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी कल्याण कुलकर्णी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार आणि कारागृह अधीक्षक श्री. विलास भोईटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे..