Home » माझी वडवणी » वडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.

वडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.

वडवणीत सर्व पक्षीय कडकडीत बंद ठेवून दुखवटा व्यक्त.

– डोंगरचा राजा / आँनलाईन 

वडवणी – शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा समाजाचे राज्यातील नेते माजी आमदार विनायकराव मेटे साहेब यांच्या दुःखद अपघाताची बातमी कळताच वडवणी शहरात सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते,तरुणांनी एकत्र येऊन संपूर्ण शहरात पाय रॅली काढून व्यापाऱ्यांना वडवणी बंदची हाक दिली.यामध्ये वडवणी शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळुन दुखवटा पाळण्यात आला. स्वर्गीय मेटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मराठा महासंघ या सामाजिक संघटनेपासून आपल्या मराठा समाजाच्या प्रश्नासाठी त्यांनी लढा सुरू केला. तसेच शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार विनायकराव मेटे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. हि बातमी वडवणी शहरासह तालुक्यात समजताच संपूर्ण तालुका शोकसागरात बुडाला. या दुःखद घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. स्वर्गीय मेटे साहेब यांचे व वडवणी तालुक्याचे मराठा महासंघाच्या सामाजिक संघटनेपासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.

यामध्ये स्वर्गीय मेटे हे वडवणी तालुक्यातील कोणत्याही सामाजिक प्रश्नासाठी व अडचणीच्या काळात सदैव धावून येत असत. वडवणी तालुक्यात त्यांच्या अपघातामध्ये निधनाची बातमी कळताच वडवणी शहरात सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते,तरुण हे रस्त्यावर आले. संपूर्ण शहरात पायी रॅली काढून मेटे साहेब अमर रहे..अमर रहे.. अशा घोषणा दिल्या. शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आपापले दुकाने बंद करण्यासाठी विनंती करून संपूर्ण वडवणी शहर,

बाजारपेठ पूर्ण दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. स्वर्गीय मेटे साहेबांच्या दुःखद निधनाचा दुखवटा पाळण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.स्वर्गीय मेटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी माजी आमदार केशवराव आंधळे, नगराध्यक्ष शेषेराव जगताप, उपनगराध्यक्ष बन्सीभाऊ मुंडे, सभापती दिनेश मस्के, शिवसेनेचे विनायक मुळे, सर्जेराव आळणे, नगरसेवक गुरुप्रसाद माळवदे,काॅग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव आंधळे, बंजारा समाजाचे नेते बी एम पवार, रोहयो माजी अध्यक्ष शिवाजी तौर, नाभिक महामंडळाचे नेते युवराज शिंदे, युवा नेते संजय आंधळे, भाजपचे राम सावंत,युवा नेते संतोष डावकर,भाई महादेव उजगरे, संपादक अनिल वाघमारे, शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सुग्रीव मुंडे सह आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या..