Home » माझा बीड जिल्हा » पांढरी येथे पै.सतीश शिंदे यांच्या हस्ते अंगणवाडी कामाचे उद्घाटन!

पांढरी येथे पै.सतीश शिंदे यांच्या हस्ते अंगणवाडी कामाचे उद्घाटन!

पांढरी येथे पै.सतीश शिंदे यांच्या हस्ते अंगणवाडी कामाचे उद्घाटन!

■ मुर्शिदपूर जि.प. गटात पांढरी येथील अंगणवाडीसाठी 8 लाख रुपयाचा निधी!

आष्टी / प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील मुर्शिदपूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य पैलवान सतीश आबा शिंदे यांच्या निधीमधून पांढरी येथे अंगणवाडी उभारण्यासाठी आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्याचे उद्घाटन आज सतीश आबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुर्शिदपूर जिल्हा परिषद गटात विविध विकास कामांची उद्घाटन करून जिल्हा परिषद गट विकसित करण्यासाठी सतीश आबा शिंदे यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामध्ये रस्ते अंगणवाडी शाळा यासह विविध विकास कामांना भरपूर निधी देऊन जिल्हा परिषद गटाचा विकास झपाट्याने सुरू ठेवला आहे येणाऱ्या काळात सर्वसामान्यांचे प्रश्न सर्व प्रश्न सुटतील असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे उद्घाटन प्रसंगी सतीश आबा शिंदे यांनी म्हटले की नागरिकांचे प्रश्न हेच माझे प्रश्न समजून मी आजपर्यंत काम करत आलो आहे यापुढे देखील करत राहील तेव्हा तुमचे प्रश्न हेच माझे प्रश्न समजून मी काम करत आहे.यावेळी तळेकर आण्णा,मोटे साहेब,सरपंच सुधीर आबा पठाडे ,अंबादास भोगाडे ,गोवर्धन शेंबडे ,रमेश भोगाडे,भाऊसाहेब शेळके, विकास हंबर्डे, बाबू वांढरे, कृष्णा वांढरे, वांढरे ,वाल्मीक वांढरे, बाबुराव वांढरे ,जालिंदर वांढरे ,घनश्याम शिंदे ,सोमीनाथ हंबर्डे ,ग्रामसेवक जगताप, अंगणवाडी सेविका जयश्री वांढरे,रुपचंद वाल्हेकर,आत्माराम वांढरे,बबन कन्हेरे,अंगद पेचे,बाबू कन्हेरे,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.