आ.प्रकाश सोळंके यांनी मतदार संघाचा घेतला आढावा.
– डोंगरचा राजा / ॲानलाईन
– अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने आज विविध बैठका घेऊन मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला !
सार्वजनिक बांधकाम विभाग व CMGSY या दोन्ही बैठकीत माजलगाव मतदारसंघातील अनेक ठिकाणांवर अतिवृष्टीमुळे दळणवळणाचे रस्ते खचले आहेत तर काही ठिकाणी पूल वाहून गेले आहेत याबाबत संपूर्ण आढावा घेतला व तातडीने इस्टिमेट तयार मंजुरीसाठी दाखल करण्याबाबत आ.प्रकाश सोळंके यांनी सुचना दिल्या.
याबरोबरच माजलगाव तहसील कार्यालय येथे सर्व शेती पिके,दळणवळण रस्ते व पूल नुकसानी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.माजलगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते,पूल,शेतीचे नुकसान आणि मानवी व जनवारांच्या झालेल्या जिवीत हानी याबद्दल आढावा घेतला.पूरजन्य परिस्थितीमुळे ज्या गावातील रस्ते व पूल खराब झाले आहेत त्याची दुरूस्ती करण्याबाबतचे आदेश दिले.अनेक गावांमध्ये पुल वाहून गेल्यामुळे दळणवळण विस्कळीत झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे या गावांचे दळणवळण सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्यात याव्यात
उमरी,गुजरवाडी येथे नव्याने पुल बांधणी करण्याच्या सूचना केल्या तो पर्यंत तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून दळणवळण सुरू करण्या करता ठोस उपायोजना कराव्यात.पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले असेल तर त्याचे पंचनामे करावेत.पुढील काळात अतिवृष्टीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाने तात्काळ मदत करावी व सतर्क राहवे. त्याचबरोबर पुढील बैठक ही,अतिवृष्टीमुळे व बदलत्या वातावरणामुळे साथीरोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याअनुषंगाने साथीरोग नियंत्रण ठेवण्या संदर्भात घेण्यात आली.यामध्ये,सर्व गावातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी उपायोजना कराव्यात.पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत त्यांची तपासणी करावी,ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत बाधित आढळतील ते बंद करून शुद्ध पिण्याच्या पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्यात यावे.अनेक गावांमध्ये जलशुद्धीकरण बंद आहे ते तातडीने सुरू करून लोकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा.आरोग्य विभाग व पंचायत समितीच्या माध्यमातून ब्लिचिंग पावडर पुरविण्यात यावे प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्राच्या ठिकाणी कर्मचारी मुक्कामी राहत नसतील तर मुक्कामी राहून साथीच्या रोगाबाबत उपाययोजना कराव्यात.साथीरोग नियंत्रणाबाबत तहसीलदार यांनी ग्रामसेवकास सूचना करण्याबत आ प्रकाश सोळंके यांनी सूचना केल्या.