Home » ब्रेकिंग न्यूज » वडवणी तालुक्यात असे असणार गट – गण

वडवणी तालुक्यात असे असणार गट – गण

वडवणी तालुक्यात असे असणार गट – गण

डोंगरचा राजा / ऑनलाइन

वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना करण्यात आली असून यामध्ये एक गट आणि दोन गणाची वाढ करण्यात आली असल्याने आता वडवणी तालुक्यात जिल्हा परिषद चे तीन गट आणि पंचायत समितीचे सहा गण असणार आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की,वडवणी तालुक्यामध्ये निवडणुकीचा रंग भरण्यास सुरुवात झाली असून आपापल्या सोईप्रमाणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण झालेत की न झालेत..याची चाचपणी आता इच्छुक उमेदवार करू लागले आहेत. दुसरीकडे प्रशासनाने वडवणी तालुक्यामधील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची पुनर्रचना केली असून यामध्ये पूर्वी असणारे चिखलबीड जिल्हा परिषद गट आणि उपळी जिल्हा परिषद गट कायम ठेवले आहेत.आता नव्याने कवडगाव हा जिल्हा परिषद गट निर्माण केला आहे. त्याचबरोबर पंचायत समितीचे गणामध्ये देखील वाढ करण्यात आली असून सुरुवातीचे पंचायत समितीचे गण चार होते यामध्ये कवडगांव पंचायत समिती गण, चिंचवण पंचायत समिती गण,उपळी पंचायत समिती गण, आणि देवळा पंचायत समिती गण हे चार पंचायत समिती गण होते.यामध्ये देखील दोन नव्या पंचायत समिती गणांची निर्मिती केली असून यामध्ये हरिश्चंद्र पिंपरी पंचायत समिती गण आणि कुप्पा पंचायत समिती गण हे दोन नवीन पंचायत समिती गण असणार आहेत.त्यामुळे आता वडवणी तालुक्यात उपळी, चिखलबीड, कवडगाव हे तीन जिल्हा परिषदेचे गट तर चिखलबीड,चिंचवण,उपळी,देवळा, हरिश्चंद्र पिंपरी,कुप्पा हे सहा पंचायत समितीचे सहा गण असणार आहेत.