Home » माझी वडवणी » श्री.ह.भ.प.वै.इंगळे महाराज यांचे प्रथम पुण्यस्मरण

श्री.ह.भ.प.वै.इंगळे महाराज यांचे प्रथम पुण्यस्मरण

श्री.ह.भ.प.वै.इंगळे महाराज यांचे प्रथम पुण्यस्मरण

– श्री.ह.भ.प.वै. इंगळे महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व तुलसी रामायण कथेचे आयोजन.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव या गावी इंगळे घराण्यातील सावित्रीबाई बाबुराव इंगळे यांच्या पोटी दिनांक 05 / 04/1954 साली वारकरी संप्रादायातील अनमोल असे रत्न ज्यांनी वारकरी सांप्रादाय व किर्तनामध्ये विनोदाची परंपरा सुरू केली असे ( आधी इंगळे पुन्हा सगळे ) म्हणणारे श्री.ह.भ.प.वै. विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे ( दादा ) हे जन्माला आले आणि त्यांच्या हातून सतत 45 वर्षा पासून वारकरी सांप्रादाय मध्ये अखंड सेवा दिली आणि जे काही किर्तनातून मानधन भेटले त्या भेटलेल्या मानधनातुन त्यांनी त्यांच्या मुळ गावी चिंचवडगाव येथील स्वतःच्या 2 एकर जागेत भव्य दिव्य असा श्री.इंगळे महाराज परमार्थ आश्रम उभा केला. आपण समाजाचे काही तरी देणे लागतोत. या हिशोबानी या आश्रमाची निर्मिती 2007 साली केली. संस्कारीक असून सुध्दा परमार्थ कसा करावा हे त्यांच्या कडुन शिकण्यासारखे होते पण गेले दिंगबर ईश्वर विभूती राहिल्या त्या किती जगामाजी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही . या प्रमाणे गल्या वर्षी दिनांक 14/05/2021 रोजी ( अक्षय तृतीया ) या दिवशी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . आणि त्यांनी आपला देह सोडला तरी त्या अनुषंगाने व दरवर्षी प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.या वर्षी श्री. ह.भ.प. श्री . बाबासाहेब महाराज इंगळे ( दादा ) यांचा प्रथम पुण्य स्मरणा निमित्त त्यांची मूर्ती स्थापना सोहळा व दरवर्षी प्रमाणे देव आणि संत व छत्रपती शिवाजी महाराज मुर्ती प्राण प्रतिष्ठा ( वर्ष 15 वे ) वर्धपना निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भव्य दिव्य तुलसी रामयण कथेचे आयोजन केले असून कथकार श्री.ह.भ.प.प.पु.गु. रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक ( नागपूर ) व किर्तन केसरी श्री.ह.भ.प.प.पु.किर्तन केसरी पांडुरंग महराज गिरी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली नियोजन केले असून दिनांक 03/05/2022 ते 10/05/2022 रोजी पर्यंत होणार आहे . त्यामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा भजन , 6 ते 7 विष्णु सहस्त्रनाम : सकाळी किर्तन 10 ते 12 दुपारी भोजन 12 ते 2 , 3 ते 6 श्रीराम कथा ( रामायण ) , सायंकाळी 6 ते 7 सामुदायिक हरिपाठ , 7 ते 8 भोजन व सायंकाळी 8 ते 10 किर्तन होणार आहेत . दिनांक 03/05/2022 रोजी पहिले गुलालाचे किर्तन ( प्रथम पुण्य स्मरणा निमित्त ) श्री.ह.भ.प. परमपुज्य गुरुवर्य मंहत भास्कर गिरीजी महाराज ( श्री क्षेत्र देवगड संस्थान ) यांचे 10 से 12 या वेळेत होणार असून त्या नंतर दुपारी 12 ते 2 श्री . ह.भ.प.वै. इंगळे महाराज यांची मुर्ती स्थापना होईल व दुपारी 3 ते 6 राम कथा होणार असून त्या नंतर रात्री किर्तन 8 ते 10 किर्तन श्री ह . भ . प . पु . गरुवर्य महंत शिवाजी महाराज ( श्री क्षेत्र नारायण गड ) संस्थान यांचे होईल व दिनांक 04/05/2022 रोजी सकाळी 10 ते 12 किर्तन श्री . ह.भ.प.धर्मगुरु अमृत आश्रम स्वामी महाराज ( नवगण राजुरी ) यांचे होईल व दुपारी 3 ते 6 रामकथा , रात्री 8 ते 10 श्री . ह.भ.प.प.पु. व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड ( गुरूजी होळ ) यांचे किर्तन होईल . व दिनांक 05/05/2022 रोजी सकाळी 10 ते 12 श्री.ह.भ.प.प.पु.बबन महाराज बहिरवाल ( मदन महाराज संस्थान कड़ा ) यांचे होईल . व दुपारी 3 ते 6 राम कथा व रात्री 8 ते 10 किर्तन श्री.ह.भ.प.प.पु.रामायणचार्य संजय महाराज पाचपोर ( बुलढाणा ) यांचे होईल . व दिनांक 06/05/2022 रोजी सकाळी 10 ते 12 श्री.ह.भ.प.प.पु. अच्युत महाराज दस्तापुरकर ( मालक ) परभणी यांचे होईल व दुपारी 3 ते 6 रामकथा व रात्री 8 ते 10 किर्तन श्री.ह.भ.प.प.पु. भागवतचार्य केशव महाराज उखळीकर ( परळी ) यांचे होईल व दिनांक 07 / 05 / 2022 रोजी सकाळी 10 ते 12 श्री.ह.भ.प.प.पु. भागवतचार्य उमेश महाराज दशरथे ( मानवत ) यांचे होईल . व दुपारी 3 ते 6 रामकथा व रात्री 8 ते 10 किर्तन श्री.ह.भ.प.प.पु. किर्तन केसरी पांडुरंग महाराज गिरी ( वावीकर ) यांचे होईल , व दिनांक 08/05/2022 रोजी सकाळी 10 ते 12 श्री.ह. भ . प . प . पु . उल्हास महाराज सूर्यवंशी ( अध्यापक श्री जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी ) यांचे होईल व दुपारी 3 ते 6 रामकथा व रात्री 8 ते 10 किर्तन श्री.ह.भ.प. प.पु. अॅड . जयवंत महाराज बोधले ( श्री क्षेत्र पंढरपुर ) यांचे होईल व दिनांक 09/05/2022 रोजी सकाळी 10 ते 12 श्री . ह.भ.प.प.पु. ज्ञानसिंधु संदीपान महाराज शिंदे ( अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ) यांचे होईल . व दुपारी 3 ते 6 राम कथा व रात्री 8 से 10 किर्तन श्री . ह.भ.प.प.पु. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरीकर ) यांचे होईल व मित्ती वैशाख शुध्द नवमी मंगळवार दिनांक 10/05/2022 रोजी सकाळी 10 ते 12 श्री . ह.भ.प.प.पु.गुरुवर्य शांतीब्रम्ह मारुती महाराज कु-हेकर ( बाबा ) यांचे काल्याचे किर्तन व नंतर महा प्रसाद चिंचवडगाव ग्रामस्थ मंडळी यांच्या कडुन होईल. तरी या पुण्यतिथी सप्ताह सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी संपुर्ण बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील श्री.ह.भ.प.प.पु.ग.वै. बाबासाहेब महाराज इंगळे ( दादा ) यांच्यावर प्रेम करणारे सर्वच संत मंहत साधु सज्जन , भाविक भक्त , किर्तनकार , प्रवचनकार , रामायणाचार्य , भागवताचार्य , गायनाचार्य , मूंदगाचार्य , व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार आणि सर्व गावाचे वारकरी , टाळकरी , भजनी मंडळ यांनी सप्ताह मध्ये उपस्थिती लावून श्री .. ह.भ.प.पु.गु.वै. बाबासाहेब महाराज इंगळे ( दादा ) यांच्या प्रथम पुण्य स्मरण सोहळा व त्यांची मुर्ती स्थापना सोहळ्यास व भव्य दिव्य तुलसी रामायण कथा प्रवक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिध्द श्री.ह.भ.प.प.पु.गु.रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक ( नागपुरकर ) हे करणार असुन तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री . ह.भ.प.सोपान महाराज इंगळे ( अध्यक्ष इंगळे महाराज परमार्थ आश्रम , विठ्ठल नगर , इंगळे वस्ती ) व सर्व ग्रामस्थ मंडळी चिंचवडगाव पुर्ण इंगळे परिवार यांनी केले आहे .