Home » माझा बीड जिल्हा » ‘त्या’ गावगुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल करा – बाबरी मुंडे

‘त्या’ गावगुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल करा – बाबरी मुंडे

‘त्या’ गावगुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल करा – बाबरी मुंडे

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

– आठवडी बाजारात हजारो रुपयांची बेकायदेशीर वसुली करणारे गावगुंड अद्यापही मोकाटच

– व्यावसायिकांना धमाकावुन वसुली करणा-या ‘त्या’ गावगुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा : बाबरी मुंडे

– बुधवारी आठवडी बाजारात बाबरी मुंडे यांच्याकडुन लाउडस्पीकर लावुन केली जनजागृती

– वडवणी नगरपंचायतने ‘त्या’ गावगुंडांवर कारवाई करण्यासाठी पोलीसांना दिले पत्र.

वडवणी – वडवणी शहरातील आठवडी बाजारात कोणतीही परवानगी नसतांना व्यावसायिकांना धमाकावुन हजारो रूपयांची वसुली केली.वसुली करणाऱ्या ‘त्या’ गावगु़ंडावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी भाजपच्या माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मुख्याधिका-यांना रितसर तक्रार दिली होती.मात्र तक्रार देऊन चार दिवस झाले तरीही त्या गावगु़ंड अद्यापही मोकाटच आहेत.कारवाई झाली नाही तर त्या गावगुंडाचे मनोधैर्य वाढेल.व ते अजुन वसुली करण्यात व व्यावसायिकांना धमाकावण्यात मागेपुढे पहाणार नाहीत.त्यामुळे त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपचे युवानेते बाबरी मुंडे यांनी. केली आहे.
वडवणीच्या आठवडी बाजारात काही गावगुंडांनी परवानगी नसतांना गोरगरीब व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडुन हजारो रूपये हप्ता वसुली केली होती.त्यासंदर्भात नगरपंचायतच्या मुख्याधिका-यांनी संबधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल. असे सांगीतल्या नंतर वडवणी पोलीसांना कारवाईची मागणी करण्यासाठीचे रितसर पत्र दिले आहे.मात्र गावगुंडांनी व्यावसायिकांना धमाकावुन हप्ते वसुली केली या घटनेला १० दिवसांचा कालावधी उलटुनही त्या गावगुंडांवर कोणतीच कारवाई झालेली नाही.भाजपचे युवा नेते बाबरी मुंडे यांनी पुन्हा व्यावसायिकांची लुट होऊ नये म्हणून दिनांक २० रोजीच्या आठवडी बाजारात लाऊडस्पिकरच्या माध्यामातुन जनजागृती केली.त्यामुळे व्यावसायिकांची लुट थांबली.मात्र हजारो रुपयांची वसुली करुनही ते गावगुंड अद्यापही मोकाटच आहेत.भाजपच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी तक्रार नोंदवल्यानंतर नगरपंचायतीने हालचाली सुरु केल्या आहेत.परंतु नगरपंचायतने दिलेल्या पत्रावर वडवणी पोलीस नेमकी काय कारवाई करततात याकडे संपूर्ण वडवणी शहरांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.
—————————————-
‘त्या’ गावगु़डांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा
—- वडवणी च्या आठवडी बाजारात काही गाव गुंडांनी छोट्या मोठ्या व्यावसायिकांना जबरदस्तीने धमकावून विनापरवानगी वसुली केल्याने नगरपंचायत चे खरे पितळ उघडे झाले आहे. बेकायदेशीररित्या व्यवसायिकां कडून हप्ते वसुली करावी अशी वसुली काही गावगुंडांनी केली आहे.तरीही नगर पंचायत ‘त्या’ गाव गुंडांना पाठीशी घालत असल्याचे दिसत आहे. हजारो रुपयांची वसुली करून ते गावगुंड अद्यापही मोकाटच असून वडवणी नगरपंचायतने त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे.जेणेकरून पुन्हा वडवणीच्या आठवडी बाजारात कोणीही व्यावसायिकांना धमाकावुन वसुली करणार नाही.
बाबरी मुंडे,भाजप युवा नेते, वडवणी
—————————

नगरपंचायतचे पत्र आलेले आहे,चौकशीत काय निष्पन्न होते ते बघु
वडवणीच्या आठवडी बाजारात काहीजणांनी नगरपंचायतची परवानगी नसतांना छोट्या व्यावसायिकांना धमाकावुन वसुली केली असल्याचे पत्र नगरपंचायत कडुन प्राप्त झालेले आहे.या प्रकरणाची कसुन चौकशी सुरू आहे.चौकशीत काय निष्पन्न होते ते बघु व त्यानंतर कारवाई केली जाईल.

आनंद कांगुणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,वडवणी पोलीस ठाणे
——————————————————-