Home » महाराष्ट्र माझा » धनंजयला भगवानबाबांचा आशीर्वाद आहे – महंत डॉ.नामदेव शास्त्री.

धनंजयला भगवानबाबांचा आशीर्वाद आहे – महंत डॉ.नामदेव शास्त्री.

धनंजयला भगवानबाबांचा आशीर्वाद आहे – महंत डॉ.नामदेव शास्त्री.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

– मी भगवानगडाचा निस्सीम भक्त; भगवानगडाच्या पायरीचा दगड होण्याचे भाग्य लाभले तरी आयुष्य सार्थक झाले समजेन – धनंजय मुंडे*

– शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील भगवानगडाच्या नारळी सप्ताहात धनंजय मुंडे यांनी घेतले दर्शन

– धनंजयला भगवानबाबांचा आशीर्वाद आहे, कोणत्याही संकटाने त्याचे काही नुकसान होणार नाही – महंत डॉ. नामदेव शास्त्री

शेवगाव – संत भगवानबाबा यांच्या शिक्षण प्रसार, भक्ती मार्ग तसेच अध्यात्मातून प्रगतीचा मार्ग शोधणे या विचारसरणीचा मी पाईक आहे, भगवानगड हे आमचे श्रद्धास्थान असुन मी गडाचा निस्सीम भक्त आहे. या गडावर 18 पगड जातीचे लोक दर्शनासाठी येतात, त्यांना गडाची ऐश्वर्यसंपन्न महती अनुभवता यावी तसेच गडाच्या माध्यमातून उच्च शिक्षण, अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना बळकटी मिळावी व गडाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्हाला योगदान देता यावे, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. भगवानगडाच्या पायरीचा दगड होण्याचे जरी भाग्य मला लाभले तरी माझे आयुष्य सार्थक झाले असे मी समजेन, असे भावनिक उद्गार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शिंगोरी (ता. शेवगाव) येथील 88 व्या नारळी सप्ताहाच्या समाप्ती सोहळ्यात काढले.

संत भगवानबाबा यांनी समाजाला एकत्रित करून वैचारिक प्रबोधन करण्यासाठी अध्यात्म मार्गाचा अवलंब करत भगवानगडाच्या माध्यमातून नारळी सप्ताहाची परंपरा सुरू केली. याच परंपरेचा भाग असलेल्या 88 व्या नारळी सप्ताहाची सांगता आज भगवान गडाचे महंत न्यायाचार्य ह. भ. प. डॉ. नामदेव शास्त्री सानप यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण अध्यात्मिक व्यासपीठावरून भाषण करण्याचे टाळतो असे सांगितले, मात्र उपस्थित जनसमुदयाने आग्रह केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भगवानगडाप्रति आपल्या श्रद्धेबाबत संबोधन केले.

धनंजय यांचे आजोळ देव धानोरा (ता. कळंब जि. उस्मानाबाद) येथे धनंजय मुंडे यांच्या मातोश्रींना भगवानगडाच्या दिंडीची, प्रत्यक्ष भगवान बाबांची सेवा घडलेली आहे, त्यांच्या कुटुंबात भगवानगड भक्तीचा वारसा आहे, त्यामुळे धनंजयला भगवान बाबांचे आशीर्वाद प्राप्त आहेत. अलीकडेच धनंजय मुंडे यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. मागील काळात त्यांच्यावर सातत्याने विविध संकटे आली, मात्र भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने धनंजय यांचे काहीही नुकसान होणार नाही, असे आशीर्वाद पर वक्तव्य महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी यावेळी बोलताना केले.

भगवान गड हा भगवान बाबांनी उभारला, एक शक्तीपीठ म्हणून आता गड प्रेरणेचा स्रोत बनला आहे. लाखो भाविकांची इथे श्रद्धा आहे. असे म्हणत धनंजय मुंडे यांनी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांना नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. यावेळी मा. आ. अमरसिंह पंडित, ऋषीकेश प्रतापराव ढाकणे, राजाभाऊ दौंड, योगेश खेडकर यांसह लाखो भाविक उपस्थित होते.