Home » माझी वडवणी » गावगुंडांकडुन होणारी वसुली तात्काळ थांबवा – भाजपा नगरसेवकांनी केली मागणी

गावगुंडांकडुन होणारी वसुली तात्काळ थांबवा – भाजपा नगरसेवकांनी केली मागणी

गावगुंडांकडुन होणारी वसुली तात्काळ थांबवा – भाजपा नगरसेवकांनी केली मागणी

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

वडवणी – आठवडी बाजारात अनोळखी गावगुंडांकडुन नगरपंचायतच्या नावाखाली गोरगरीब लोकांना धमकावून बेकायदेशीर रितीने पैसे गोळा करण्याचा खेळ मांडला असून याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, वडवणी शहरातील आठवडी बाजारात अनोळखी गावगुंडांकडुन नगरपंचायतच्या नावाखाली गोरगरीब लोकांना धमकावून बेकायदेशीर रितीने पैसे गोळा करण्याचा खेळ मांडला आहे.नगरपंचायतचा बाजार चिठठीचा अद्याप लिलाव झालेला नाही.बोगस मटक्याच्या चिठ्ठ्या वर रक्कम टाकून वडवणीतील काही अनोळखी गावगुंड आठवडी बाजारात माळव्यावाले,शेळ्यावाले,कोंबड्या वाल्यांकडुन व इतर छोट्या मोठ्या धंद्यावाल्या लोकांकडून २० रुपये प्रमाणे खोट्या मटक्याच्या चिठ्ठ्या देत अनाधिकृत पणे व दादागिरी करून पैसे गोळा करत आहेत.यामुळे आठवडी बाजाराला येणाऱ्या छोट्या मोठ्या धंद्यावाल्यांना या बेकायदेशीर गावगुंडांचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपंचायतच्या नावाखाली बोगस मटक्याच्या चिठ्ठ्या वर पैसे गोळा करणाऱ्या गावगुंडांवर तात्काळ योग्य ती कारवाई करुन बंदोबस्त करावा अन्यथा याचा कुठल्याही क्षणी उद्रेक होऊन नुकसान होईल व याची सर्व जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घेण्याचा इशारा देत संबंधित निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी व पोलिस ठाण्यात दिल्या असून या निवेदनावर नगरसेविका सौ.मंगल राजाभाऊ मुंडे, नगरसेवक सचिन सानप, नगरसेवक गिण्यानदेव राठोड,नगरसेविका मेहताबी अब्दुल रौफ पठाण, नगरसेविका सौ.मिरा भिमराव उजगरे, नगरसेविका सौ.रुपिका विनय नहार, नगरसेवक हरिदास टकले, नगरसेवक अरुण मुंडे, नगरसेविका सौ.मिरा सुधिर ढोले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.