Home » ब्रेकिंग न्यूज » मी वाट बघतोय – एस.एम.देशमुख

मी वाट बघतोय – एस.एम.देशमुख

मी वाट बघतोय – एस.एम.देशमुख

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

– गंगाखेड जवळ अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची रेलचेल.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे ऐतिहासिक शहर तर आहेच त्याचबरोबर ही संत जनाबाईंची जन्मभूमी आहे.. येथे जनाबाईंचे मंदिर आणि अन्य अनेक मंदिरं आहेत.. जुने वाडे हे देखील गंगाखेडचं वैशिष्टय़ आहे..त्यामुळे गंगाखेडला येऊन आपण धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो..

गंगाखेडच्या सभोवतालचा परिसर देखील धार्मिक आणि ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे..इकडे मुद्दाम भेट द्यावीत अशी असंख्य ठिकाणं आहेत..
बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतिर्लिंग म्हणजे परळीचा वैजनाथ आणि औढयाचा नागनाथ गंगाखेडपासून अगदी काही किलो मिटरच्या अंतरावर आहेत..
नांदेडच्या जगप्रसिद्ध गुरूव्दाराच्या दर्शनाचा लाभ देखील आपल्याला घेता येऊ शकतो..
साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाल्याचा काहींचा दावा आहे.. पाथरीत साईबाबांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेता येऊ शकते..
अंबाजोगाईचं महत्व वेगळं सांगण्याची गरज नाही.. अंबाजोगाई येथील योगेश्वरी (पार्वती) मंदिर प्रसिद्ध आहे.. ही देवी अनेकांची कुलदेवता आहे..
मराठी भाषेचा उगम अंबाजोगाई येथे झाला,याबाबत सर्व भाषातज्ज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधू या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.अंबाजोगाईत पाहण्यासारखी इतरही अनेक ठिकाणं आहेत..
गड किल्ल्यांची आवड असलेल्या मित्रांसाठी कंधार येथील किल्ला पाहण्याची संधी आहे.. राष्ट्रकुटांच्या काळातील हा किल्ला १५ एकरात पसरलेला आहे.. किल्ल्याच्या भोवती खंदक आहे..
थोडा रस्ता वाकडा करून आपल्याला धारूरचा भुईकोट किल्ला देखील पाहता येऊ शकतो..
म्हणजे मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्षांचा मेळाव्यास आल्यास आपणास मराठवाड्यातील आणि गंगाखेड परिसरातील अनेक प्रेक्षणीय स्थळांना आपणास भेट देता येऊ शकते..

*तेव्हा ही संधी चुकवू नका*..
*गंगाखेडला नक्की या*
*मी आपली वाट बघतोय*
*SM*