Home » blog » पुरस्कारांचा नायक..एकनिष्ठ व संयमी व्यक्तिमत्व म्हणजेच..अनिल महाजन

पुरस्कारांचा नायक..एकनिष्ठ व संयमी व्यक्तिमत्व म्हणजेच..अनिल महाजन

पुरस्कारांचा नायक..एकनिष्ठ व संयमी व्यक्तिमत्व म्हणजेच..अनिल महाजन

अनिल विश्वनाथराव महाजन यांचा जन्म
धारूर शहरात दिनांक ३१/०३/१९७४ ला झाला. त्यांचं शालेय शिक्षण शहरातील जिल्हा परिषद शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण धारूर आणि बीड या ठिकाणी बी एस्सी,बी.जे. पर्यंत पुर्ण झाले.
महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच त्यांना पत्रकारिता आणि सामाजिक कार्याची तळमळ होती.सामाजिक कार्यात तर त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांनी किल्लारी भागातील भुकंपाच्या वेळी दोन दिवस लिंबाळा गावात मदत कार्यात सहभाग घेतला.अ.भा.वि.प.चे माध्यमातून विद्यार्थी चळवळीत पाच वर्ष सक्रीय सहभाग होता.आर्य वीर दला चे माध्यमातून आर्य समाजाच्या चळवळीत सतत सात वर्ष कार्य केले.त्याचबरोबर गुजरात भुकंप ग्रस्तां साठी पुढाकार घेऊन एक लाख एकावन्न हजाराचा निधी जमवून तत्कालीन जिल्हाधीकारी नरेंद्र कवडे यांच्या डिडी सुपूर्त केला.या निधी साठी एक हाॅटेल दिवसभर चालवले.
ग्रामस्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग तालुक्यातील चिंचाळा,अंजनढोह,सोनीमोहा आदी गावात काम केले.ग्रामस्वच्छता तपासणी शासकीय समिती वर दोन तिन वेळा काम केलं,शासकीय तंटामुक्ती तपासणी समिती वर चार वेळा निवडही झाली होती.नगरपालीका स्वच्छता अभियानात सक्रीय सहभाग धारूर नगर परीषद जिल्ह्यात अन् विभागात सतत तिन वर्ष प्रथम तर राज्यस्तरावर विशेषा सहभाग पुरस्कार मिळवला.धारूर तालूक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फांडेशनच्या दुसऱ्या वाॅटर कप स्पर्धेत
जायभायवाडी या गावात कामा करून गावकरी मंडळीचा सहभाग वाढवून माथा ते पायथा जलबचतीचे काम करून राज्यात व्दितीय क्रंमाकाचे बक्षिस मिळवले. तर तिसऱ्या वाॅटर कप स्पर्धेत जायभायवाडी,व्हरकटवाडी,सिंगनवाडी आसोला,निमला आदी गावात सक्रीय काम केलं.चौथ्या वाॅटर कप स्पर्धेत २०१९ मध्ये मोठेवाडी,सोनीमोहा,मोरफळी या गावात सक्रीय सहभाग घेतला.धारूर शहराचे विवीध प्रश्ना वर संघर्ष करुन आंदोलनातही सहभाग राहिला. शहरातील दुधाळा तलावाचे खोलीकरणाचे काम करण्यासाठी पुढाकार घेतला.बीड जिल्ह्यातील आनाथालये ऊस तोड कामगारांच्या शाळांना धान्याची मदत केली.पत्रकारांच्या प्रश्नावर मराठी पत्रकार परीषदेच्या माध्यमातून राज्यात सातत्याने आवाज उठवला.पत्रकारांना मदत व्हावी यासाठी पत्रकार कल्याण निधीचा उपक्रम राबविला.
सामाजिक कार्यात सातत्याने पंचेवीस वर्षा पासून सक्रीय सहभाग घेतला.तालूका स्तरीय शिक्षण समितीवर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.
यामध्ये ज्ञानदीप विद्यालय व बालसंस्कार केंद्राचे माध्यमातून दहा वर्ष शैक्षणिक परीवर्तन घडवून आणले. त्याघ बरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सुध्दा प्रयत्न केले. गेली पंचेवीस वर्षा पासून विविध दैनीकांची कामे त्यांनी केली आहेत. पत्रकारीतेच्या माध्यमातून विविध पत्र मांडले.औरंगाबाद मराठवाडा जनता विकास परीषदेवर सुध्दा त्यांनी विविध पदावर काम केले आहे.विद्याभारती प्रांत प्रचार समिती वर काम करत त्यांची अशासकीय शहर दक्षता समिती २०२१ मध्ये नियूक्ती केली गेली. कोरोना २०२० तब्बल ०४ महीने प्रशासनाला विविध पातळीवर मदत करुन गोर गरीब व गरजुंना जिवना आवश्यक वस्तूंचे १ हजार पेक्षा जास्त किट मानव लोक, ज्ञानप्रबोधनी, ग्रामउर्जा या संस्थांच्या माध्यमातून वाटप केले. सॅनिटायजर,मास्क,पि.पी. किट नागरिकांना दिले .सन २०२१ चे कोरोना काळात त्यांचं प्रशासनास विशेष सहकार्य लाभले. नगरपरीषदेच्या प्रभाग एक मधील शासकीय समिती वर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.
लोकमत एक रक्ताच नातं या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन ७ जुलै २०२१ रोजी आयोजित करून उस्फूर्त प्रतिसाद मिळवला होता. राजश्री शाहू महाराज जयंती निमीत्त दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन आणि गरजू व गरीब विद्यार्थ्याना शिक्षणासाठी मदत ते करत राहतात.
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्नांवर मराठी पत्रकार परीषदेच्या माध्यमातून विवीध विषयांवर कामं केली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन योजना यावर सतत लढ्यात सहभाग आणि राज्यात दर्पण कार बाळशास्ञी जांभेकर यांचा पहीला अर्धाकृती पुतळा धारूर येथील नवोदित शिल्पकार सुधिर उमाप यांचे कडून बनवून घेऊन ६ जानेवारी २०२२ रोजी धारूर येथे दर्पण दिनाचे कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण मान्यवराचे हस्ते करून मुंबई येथे मराठी पत्रकार परीषद कार्यालयात हा पुतळा ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.मानवलोकच्या वतीने ग्रामीण रुग्णालयास टाटा कंपनीचे फिल्टर तासी दोनशे लिटर पिण्याचे पाणी मिळणारे जानेवारी २०२२ मध्ये दिले. येथे येणाऱ्या रुग्णाची पाण्याची सोय त्यामुळे झाली आहे. सा.भवानी आशीर्वादचे उपसंपादक जुन १९९० पासून काम सुरू केले. पुढे दै.बीड रिपोर्टर, दै.एकमत, दै.देवगीरी तरूण भारत, मराठवाडा, दै. लोकपत्र या दैनीकाचे तालूका प्रतिनीधी म्हणूनही काम केले. दै. चंपावतीपत्र चे १९९२ पासून तालूका प्रतिनीधी,विभागीय प्रतिनीधी आणि उपसंपादक म्हणूण काम तर दै. लोकमत चे १ डिसेंबर १९९७ पासून तालूका प्रतिनीधी म्हणूण काम सुरू आहे. ऐतिहासीक धारूर शहराचे वैभव असणारे येथील ऐतिहासीक किल्ला व इतर वैभव जपले गेले पाहीजेत यासाठी त्यांनी तिस वर्षापासून सतत पाठपूरावा. धारूर तालुका निमीर्ती नंतर तालूक्याची मोड तोड करून ३३ गावचा तालूका केला तालुक्याच्या पुर्नरचनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना शिष्टमंडळ भेटले पुनर्रचना समिती करून आंदोलन उभारून राज्य शासनास पुर्नरचना करण्यास भाग पाडले.
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांची भेट लातूर येथे २०२२ जानेवारी मध्ये घेऊन विविध प्रश्न मांडले आहेत.त्यांनी अनेक शासकीय अशासकीय पदांवरही उत्कृष्ट अशी कामे केली आहेत.यामध्ये पाहिले तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ते २०१७ – २०१९ राज्य सरचिटणीस होते.नंतर २०१९ ते आजपर्यंत त्यांच्या कडे राज्य प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी आहे.ते धारूर येथील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष असून दैनिक चंपावतीपत्रचे उपसंपादक म्हणून काम करत आहेत.वचनपुर्ती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुध्दा त्यांच्याकडे आहे. बीड जिल्हा पत्रकार कल्याण निधी समिती चे सहसचिव आणि धारुर कायाकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुध्दा आहेत. ते १९९७ पासून दै.लोकमत साठी तालुका प्रतिनिधी म्हणूनही काम करतात. लघू पाटबंधारे विभाग बीड साठी तालुका जलनायक आणि मराठवाडा जनता विकास परीषद औरंगाबाद चे बीड जिल्हा अभ्यास गट समिती सदस्य पदी २०१९ साली झाली आहे.
धारूर तालुक्याच्या शिक्षण समितीवर आणि २०२१ साली शहर दक्षता समितीचे अशासकीय सदस्य म्हणून काम पाहिले. मराठी पत्रकार परिषद औरंगाबाद विभागीय सचिव म्हणून २०१६ – २०१७
तसेच २०२१ पासून ज्ञानप्रबोधनी देवगीरी प्रांत
राज्य सोशल मिडीया प्रमूख म्हणून काम करत आहेत.त्याचबरोबर मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बीड जिल्हा अभ्यास समितीवर सदस्य म्हणूनही काम सुरू आहे. या आमच्या स्नेही मित्राच्या गौरवास्पद पुरस्काराबद्दल बोलायचं झालं तर दैनिक चंपावतीपत्रचा स्व.सुनिल देशमुख स्मृती शोध पञकारीता पुरस्कार, अंबेजोगाई तालुका पत्रकार संघाचा साधू गुरूजी उत्कृष्ट पञकारीता पुरस्कार,स्व.ईश्वरचंदजी गुप्ता उत्कृष्ट पञकारीता पुरस्कार,उदगीर तालूका पत्रकार संघाचा उत्कृष्ट पञकारीता पुरस्कार,सतत पाच वर्ष दै.लोकमतचा स्टार वार्ताहर पुरस्कार,ब्राम्हण समाज एकता मंडळाचा परशूराम पुरस्कार,लोकजागर संस्थेचा समाजभूषण पुरस्कार,राज्य पुरातत्व विभागाचे वतीने उत्कृष्ट कार्या बद्दल २०१६-१७ साली गौरव आणि २०१८ साली जलबचतीच्या चळवळीत उत्कृष्ट कार्या बद्दल मानव लोक संस्थेच्या वतीने गौरव, २०१६ साली दैनिक चंपावतीपञच्या वतीने सुवर्णमोहत्सवी कार्यक्रमात उत्कृष्ट पञकारीते बद्दल गौरव. २०१७ साली कै.हेमंतराजेमाने सेवा भावी संस्थेच्या वतीने वाॅटर कप स्पर्धेतील उत्कृष्ट कार्या बद्दल गौरव.रोटरी क्लब धारूर च्या वतीने १५ ऑगस्ट २०२१ ला कोव्हिड योध्दा म्हणूण सन्मान,
विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने ऑक्टोबर
२०२१ मध्ये कोरोना योध्दा म्हणूण सन्मान..
*अशा एक ना अनेक बाबींनी सतत चर्चेत असणा-या आमच्या स्नेही मित्राच्या वाढदिवसाचे निमित्ताने हा सर्व लेखाजोखा मांडत आहे.ते आवश्यकही आहे.कारण संकटं येतात आणि जातात मात्र माझा हा जिवलग मित्र संकट कोणतेही असो त्या संकटांवर मात करण्यासाठी सदैव तत्पर राहतो हे देखील तितकेच खरे आहे.आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्याला आपलंसं करून घेण्यात तरबेज असतो.त्यांच्या अशा मनमिळावू स्वभावामुळेच त्यांना मानणारा फार मोठा वर्गही दिसून येतो.
आमचे नावकरी अनिल हे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागणारे सर्वांशी मिळून चालणारे सुख दुःखाच्या क्षणी धावून जाणारे दिन दलित शोषितांच्या कार्यास उपस्थित राहून हातभार लावणे. सतत हसतमुख व प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून या मित्राचा परिचय सर्वांना आहे. कितीही वादळं आली.. कितीही प्रलयंकारी घटना घडून आल्या तरी नंददीप जसा चिरकाल तेवत राहतो. अगदी तशाच प्रकारे माझ्या मित्राच्या आयुष्याचा विचार पहावयास मिळतो..अशा या पुरस्कारांच्या नायकास.. सामाजिक अन् एकनिष्ठ व संयमी व्यक्तिमत्वास म्हणजेच.. आमचा नावकरी स्नेही मित्र अनिल महाजन यांस वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..*

*- संपादक अनिल वाघमारे*
*(राज्य कार्यकारिणी सदस्य)*
*अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई*