Home » Uncategorized » पुढील निर्देश जारी – जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

पुढील निर्देश जारी – जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

पुढील निर्देश जारी – जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

– कोविड-19 विषाणूवर नियत्रंण ठेवण्यासाठी यापूर्वीचे निर्देश अधिक्रमित करुन पुढील निर्देश जारी.

बीड – बीड जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियत्रंण ठेवण्यासाठी यापूर्वीचे निर्देश अधिक्रमीत करुन पुढीलप्रमाणे निर्देश दि. 4 मार्च 2022 रोजी 00 वाजेपासून नवीन आदेश निर्गमित होईपर्यंत लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कळवले आहे.

सर्व अस्थापनांच्या सर्व कर्मचा-यांनी जे मोठया प्रमाणावर सार्वजनिक सेवा पुरवतात, होम डिलिव्हरी कर्मचारी, कोणत्याही सार्वजनिक वाहतूक वापरकर्ते, मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे,रेस्टॉरंटस, क्रीडा कार्यक्रम,धार्मिक स्थळे इत्यादी सर्व अभ्यागत यांनी पूर्णपणे लसीकरण पूर्णपणे करणे आवश्यक आहे.

जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) कोणत्यही सार्वजनिक सेवेवर पूर्णपणे लसीकरणाची आवश्यकता लागू करु शकते. जिथे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क येतो अशा नागरिकांच्या परस्पर संपर्कामुळे कोकवड-19 चा प्रसार होऊ शकतो आणि जेथे कोविड योग्य वर्तन (CAB) प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. सार्वजनिक किंवा खाजगी कोणत्याही कार्यालयात किंवा आस्थापनेमध्ये काम करणा-या सर्व कर्मचारी ज्यांचा सामान्य नागरिकांशी संपर्क येतो, औद्योगिक कंपनी, आस्थापनेवरील सर्व कर्मचारी यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाच्या संबंधित प्रशासकीय विभागाच्या कोणत्याही आदेशाच्या आधीन राहून सर्व शैक्षणिक संस्थामध्ये ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरु करता येईल. सर्व शैक्षणिक संस्थाच्या प्रशासनानां ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने शिक्षण देण्याच्या हायब्रीड मॉडेलचा वापर करता येईल. सर्व पूर्व प्राथमिक शाळा (pre-schools) अंगणवाड्या प्रत्यक्षरिरीत्याही सुरु करता येतील. या सर्व संस्था, आस्थापनांनी कोकवड योग्य वर्तन (CAB) चे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

सर्व प्रशासकीय युनिट्ससाठी होम डिलेव्हरी सेवांना परवानगी असेल. सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरॅट आणि बार, स्पोरिस कॉम्प्लेक्स, जीम, स्पा, स्विमिंग पुल, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, मनोरंजन उद्याने इत्यादी यांच्या क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने कार्यरत राहतील. पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी आंतर-राज्य आणि राज्याअंतर्गत प्रवासावर कोणतेही निर्बंध राहणार नाही. पूर्णपणे लसीकरण न झालेल्य व्यक्तींसाठी, आंतरराज्य प्रवासासाठी 72 तास वैधतेचे RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक राहील. अशा प्रवासासाठी कोणत्याही एनओसीची गरज असणार नाही.

सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. सर्व औद्यागिक आणि वैज्ञानिक संस्था पूर्ण क्षमतेने कार्य करु शकतील. येथे समाविष्ठ नसलेल्या कोणत्याही बाबींसाठी क्षमतेच्या 50 टक्यापर्यंत परवानगी राहील. या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणा व सर्व संबधित विभागाची राहील. सदरील आदेशाचे पालन न करणारी , उल्लघन करणारी कोणतिही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 नूसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि नियमानूसार कारवाई करण्यात येईल. हे आदेश दि. 4 मार्च 2022 रोजी 00 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.