Home » ब्रेकिंग न्यूज » अंबाजोगाई साखर कारखान्याचा उद्या बाॅयलर पेटणार..

अंबाजोगाई साखर कारखान्याचा उद्या बाॅयलर पेटणार..

अंबाजोगाई साखर कारखान्याचा उद्या बाॅयलर पेटणार..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

– अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा शुक्रवारी सन २०२१-२२ गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ.

अंबाजोगाई – बीड-लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा हे कार्यक्षेञ असलेला आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसाठी वेळोवेळी संजिवनी ठरलेला अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या वर्षाच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ शुक्रवार,दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजी दुपारी एक वाजता होणार आहे.

 

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अंबासाखरचा सन २०२१-२२ गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ शुक्रवार,दि.७ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजता ह.भ.प.महंत भगवान महाराज वरपगावकर (मठाधिपती साधु शिवरामपुरी मठसंस्थान,वरपगाव) यांच्या शुभहस्ते होत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश बाबुरावजी आडसकर हे आहेत.मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असलेल्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ प्रसंगी कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे,प्रभारी कार्यकारी संचालक सुरेश साखरे व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

*१२ ते १५ जानेवारी दरम्यान अंबासाखरच्या गळीत हंगामास प्रारंभ :*

शुक्रवार,दिनांक ७ जानेवारी रोजी अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना लि.अंबासाखरचा सन २०२१-२२ वर्षासाठीचा गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.पुढील आठवड्यात म्हणजे १२ ते १५ जानेवारी दरम्यान अंबासाखर प्रत्यक्ष ऊस गाळपास प्रारंभ करणार आहे अशी माहिती चेअरमन रमेश आडसकर यांनी दिली आहे.