Home » माझा बीड जिल्हा » ऊस लागवडीसाठी १५ फेब्रुवारी २०२२ अखेर मुदतवाढ.

ऊस लागवडीसाठी १५ फेब्रुवारी २०२२ अखेर मुदतवाढ.

ऊस लागवडीसाठी १५ फेब्रुवारी २०२२ अखेर मुदतवाढ.

– चेअरमन धैर्यशील काका सोळंके यांची घोषणा.

डोंगरचा राजा / ॲानलाईन.

माजलगाव – गाळप हंगाम २०२२-२३ करीता कारखाना गाळप क्षमतेएवढा ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध छावा याकरीता ऊस लागवडीसाठी माहे १५ फेब्रुवारी, २०२२ अखेर मुदतवाढ दिली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. धैर्यशीलकाका सोळंके यांनी दिली.

           या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की, हंगाम सन २०२१-२२ गळीत हंगामात कारखान्याकडे नोंदलेले सर्व क्षेत्राचे गाळप करणेच्या दृष्टीने सर्वतोपरी नियोजन केलेले आहे. या हंगामासाठी कारखाना व्यवस्थापनाने ११.०० लाख मे.टन ऊस गाळपाचे उधिष्ठ निश्चीत केलेले आहे. कारखान्याची प्रचलीत गाळप क्षमता दैनिक ५००० मे. टनाची असताना देखील मा. आ. श्री. प्रकाशदादा सोळंके साहेब यांचे मार्गदर्शनाखाली योग्य ते नियोजन करून गाळप क्षमतेपेक्षा दैनिक जादा ऊसाचे गाळप सुरु आहे. परंतु आपले कार्यक्षेत्रात ऊस लागवडीसाठी सिंचन सुविधा असल्याने पुरेसा वाव आहे. कार्यक्षेत्रात गाळप करीत असलेले कारखाने व होवू घातलेले कारखाने याचा विचार करता कारखाना व्यवस्थापनाने सन २०२२-२३ गाळप हंगामासाठी १४.०० लाख मे.टन गाळप उचिष्ठ ठेवून सध्याचे मशिनरीमध्ये दैनिक ७००० मे.टन ऊसाचे गाळप करणेसाठी आवश्यक ते बदल करणेचे • नियोजन केले आहे. ऊस लागवड हंगाम २०२१-२२ मध्ये ८५०० हेक्टर क्षेत्रावर माहे जानेवारी, २०२२ अखेर ऊस लागवडीचे धोरण आहे. परंतु कार्यक्षेत्रातील इतर कारखान्याची गाळप क्षमता व आपले कारखाना नियोजीत वाढीव गाळप क्षमतेचा विचार करुन माहे १५ फेब्रुवारी, २०२२ अखेर ऊस लागवडीसाठी मुदतवाढ देणेचे धोरण निश्चीत आहे. त्यानुषंगाने माहे १५ डिसेंबर, २०२१ अखेर ४५९८ क्षेत्रावर ऊस नोंद झालेली असुन ऊस लागवडीची पुर्तता व्हावी याकरीता ऊस परवाना घेवूनच शिफारसीत जातीच्या लागवडी साठी जानेवारी २०२२ या महिन्याकरीता २८०० हेक्टर व १५ फेब्रुवारी २०२२ या पंधरवाडयाकरीता ८०० हेक्टर असे एकुण ३६०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड कारखाना व्यवस्थापनाने मंजुरी देण्यात आलेली आहे.

या धोरणानुसार पुढील गळीत हंगाम २०२२ २३ करीता ऊस लागवड करु इच्छिणा-या ऊस उत्पादक सभासदांनी दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ अखेर लागवड करुन पुढील हंगामासाठी १४.०० लाख मे.टन ऊस गाळप उधिष्ठ पुर्तीसाठी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. धैर्यशीलकाका सोळंके यांनी केले आहे.