महाराणी ताराबाई शाळेतील दोन विद्यार्थी पाॅझिटीव्ह;
– डोंगरचा राजा / ॲानलाईन
वडवणी – वडवणी या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थी कोरोना पाॅझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेण्याचं आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,करोना महामारीच्या काळात होत्याचं नव्हतं झालं. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.आजही अनेकजण या संकटांला सामोरे जात आहेत.अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत.शासन – प्रशासन युद्ध पातळीवर कामही करतंय मात्र त्याला हेच नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचेही समोर आले आहे.शाळा सुरू करायची की नाही जर करयाची असेल तर कोणत्या वर्गापर्यंत करायची असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.एकदाचा निर्णय झाला आणि शाळा महाविद्यालये सुरू करण्यात आली.शाळा महाविद्यालये यांच्या कडुन या बाबी गंभीर घेतल्या जात आहेत.शाळेत येताना सर्व नियमांचे पालन विद्यार्थ्यांनी करावं अशी ताकीद दिली जाते.मात्र पालक आपल्या मुलांना या बाबतीत सतर्कता बाळगा म्हणून सांगण्यात कमी पडत आहेत.तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणांनी सुध्दा यावरही थोडा विचार करण्याची गरज आहे.वडवणी शहरातील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.शालेय विभागाच्या सुत्रांनी डोंगरचा राजा ही माहिती दिली आहे.