Home » ब्रेकिंग न्यूज » निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय;ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरील निवडणुका स्थगित.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय;ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरील निवडणुका स्थगित.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय;ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरील निवडणुका स्थगित.

– डोंगरचा राजा / आँनलाईन

मुंबई – सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती दिल्याने आता ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरील निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे.

बीड जिल्ह्यातील केज,शिरूर कासार, वडवणी,पाटोदा आष्टी नगरपंचायत चा यामध्ये समावेश आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशात स्थगित केल्यानंतर त्याचा परिणाम राज्यातील आगामी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बघायला मिळणार आहे.सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती दिल्याने आता ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवर निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. राज्यातील 32 जिल्ह्यामधील 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान होत आहे. या निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.पण आता राज्यातल्या सगळ्या नगरपंचायत मधील ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवर निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच खुला प्रवर्ग,अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागांवरच सार्वत्रिक निवडणूक होईल असा राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आला आहे.

तब्बल 400 जागांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती राज्य निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वीच राज्यातील 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार येथे अखिल डिसेंबरला 106 नगरपंचायत मधील 1802 जागांसाठी 21 डिसेंबरला मतदानाचा कार्यक्रम पार पडणार होता.

पण सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण संदर्भात सुरू असलेल्या याचिकांवर काल जी सुनावणी झाली त्यामध्ये राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी काढलेला अध्यादेश कोर्टाकडून स्थगित करण्यात आला.

तसेच ओबीसी आरक्षण असलेल्या जागांचा निवडणुकीच्या कार्यक्रमाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती द्या. असा आदेश कोर्टाने दिला.त्यामुळे कोर्टाच्या या निर्वाळ्याचा थेट परिणाम या निवडणूकीवर पडताना दिसत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षित जागांची निवडणूक जरी स्थगित केली असली तरी इतर प्रवर्गातील जागा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच निवडणुका होणार आहेत. राज्यात 106 नगरपंचायती मधील एकूण 1 हजार 802 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे 1,80 2 पैकी 337 जागा रुपेश आरक्षण आहे.