Home » ब्रेकिंग न्यूज » मराठी पत्रकार परिषदेचे उरुळी कांचन अधिवेशन लांबणीवर – एस.एम.देशमुख

मराठी पत्रकार परिषदेचे उरुळी कांचन अधिवेशन लांबणीवर – एस.एम.देशमुख

मराठी पत्रकार परिषदेचे उरुळी कांचन अधिवेशन लांबणीवर – एस.एम.देशमुख

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

पुणे – मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन २७ आणि २८ डिसेंबर रोजी उरूळी कांचन येथे होणार होते… मात्र त्याच दिवशी विधीमंडळाचे अधिवेशन होत असल्याने बहुसंख्य मान्यवरांनी परिषदेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविली आहे.. त्यामुळे परिषदेचे अधिवेशन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे..कोरोनाची तिसरया लाटेची शक्यता देखील या निर्णयाला एक किनार आहे.. मराठी पत्रकार परिषद कार्यकारिणी आणि स्थानिक संयोजन समितीने एकमताने अधिवेशन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे…

मा. शरद पवार साहेब, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष मा. खा. अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा करून पुढील तारखेचा निर्णय घेतला जाईल आणि तो सर्वांना कळविला जाईल.

या निर्णयामुळे झालेल्या गैरसोयीबददल आम्ही दिलगीर आहोत..

 

*एस.एम.देशमुख*

आणि कार्यकारिणी

मराठी पत्रकार परिषद, मुंबई