Home » ब्रेकिंग न्यूज » उमेदवारांच्या चाचपणीसाठी आ.पवार वडवणीत.

उमेदवारांच्या चाचपणीसाठी आ.पवार वडवणीत.

उमेदवारांच्या चाचपणीसाठी आ.पवार वडवणीत.

डोंगरचा राजा / ॲानलाईन

वडवणी नगर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम आता पूर्ण क्षमतेने पेटला असून सत्ताधारी भाजपाच्या वतीने ताकदीने ही निवडणूक लढवली जाणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसाठी पक्षाच्या वतीने गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आ.लक्ष्मण पवार हे आज दि.३० नोव्हेंबर २०२१ मंगळवार रोजी दुपारी ठीक १ वाजता वडवणी शहरातील आनंद मंगल कार्यालय याठिकाणी येत आहेत. तरी याप्रसंगी सर्व इच्छुक भाजपा उमेदवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आगामी वडवणी नगरपंचायत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत पुनश्च एकदा संपूर्ण बहुमताने आपल्या ताब्यात घेवून वडवणी शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याच्या विश्वासातून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी संपूर्ण ताकदीनिशी कामाला लागले असून या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी भाजपाच्या वतीने गेवराई विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आ.लक्ष्मण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ.लक्ष्मण आण्णा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ मंगळवार रोजी दुपारी ठीक १ वाजता वडवणी शहरातील आनंद मंगल कार्यालय, साळींबा रोड याठिकाणी सर्व इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार असून तरी याप्रसंगी सर्व इच्छुकांनी उपस्थित राहून आपले मत मांडावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.