Home » ब्रेकिंग न्यूज » लोकनेते सोळंके कारखान्याचा पहिला हप्ता बँकेत वर्ग.

लोकनेते सोळंके कारखान्याचा पहिला हप्ता बँकेत वर्ग.

लोकनेते सोळंके कारखान्याचा पहिला हप्ता बँकेत वर्ग.

– अडचणीच्या काळात हप्ता मिळाल्याने शेतकऱ्यांत आनंद.

वडवणी – लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यांने चालु गळीत हंगामातील ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रति टन २१०० रुपये बँकेत वर्ग केला आहे. ऊसाचा हप्ता तातडीने बँकेत वर्ग केल्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत कारखाना प्रशासनाविषयी समाधान व्यक्त केले जात आहे.
लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचा या वर्षीचा गाळप हंगाम २६ ऑक्टोंबरला सुरू झाला होता. पावसाचे वातावरण असल्यामुळे सुरुवातीला अनंत अडचणी आल्या तरीही कारखान्याने योग्य नियोजन केल्यामुळे दिनांक २४ नोव्हेंबर पर्यंत सुमारे एक लाख ५५ हजार ३५०मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी ८.८४ साखर उतारासह एक लाख २६ हजार ६५० क्विंटल साखरेचे उत्पादन कारखान्याने केले आहे. त्याचबरोबर सुमारे १४१२०५० लिटर इथेनॉलचे उत्पादन करून ७२१८००० युनिट विजेची निर्यात केलेली आहे. सन २०२१- २२ हंगामासाठी केंद्र शासनाचा रास्त व किफायतशीर दर एफ आर पी प्रतिटन २३४१.१५ आलेली असून त्यापैकी २६ ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत गाळप झालेल्या ७५४२७.६७४ मेट्रिक टन ऊस बिलासाठी पहिला अग्रीम हप्त्याची रक्कम २१०० रुपये प्रति टन याप्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. ऊस उत्पादकांनी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन ऊसाची रक्कम घेऊन जावी चालू हंगामामध्ये ११.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यालाच द्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन धैर्यर्शील काका सोळंके यांनी केले आहे. ऊस बिलाचा पहिला हप्ता लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्याने लवकर काढल्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कारखान्याच्या प्रशासनाविषयी आणखीनच विश्वासार्हता वाढली आहे.