Home » ब्रेकिंग न्यूज » एपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब..

एपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब..

एपीआयनेच न्यायालयाला विचारला जाब..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

– तुमच्यावर गुन्हा दाखल का दाखल करू नये.

वडवणी – आपण लोकसेवक आहात. आपले आचरण कायद्याला धरून असावं. तुम्ही जाणीवपूर्वक सूडबुद्धीने वागत आहात. आम्हास नुकसान व्हावे या उद्देशाने कायदेशीर अधिकार आमच्याविरुद्ध वापरत आहात. आम्हाला नुकसान पोहोचण्यासाठी आम्हाला धाक दाखवत आहात. त्यामुळे आपल्या विरोधात गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये असे थेट पत्र न्यायदंडाधिकारी यांना येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी पाठविले ते पत्र गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून फौजदाराने न्यायाधीशांना गुन्हा दाखल करण्याबाबतच्या या पत्राने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा घडवून आणली असून जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी या प्रकरणी दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक निरकर यांना जाब विचारण्यासाठी कार्यालयात बोलावल्याचे वृत्त आहे. मिरकर यांनी मात्र हे पत्र आपले नसल्याचे सांगितले परंतु त्यावर वडवणी पोलीसांचा सही आणि शिक्का आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की सदरील पत्र हे दोन दिवसांपूर्वीच फिरत असल्याची कबुली देखील मिरकर यांनी दिली आहे. हे पत्र एपीआय मिरकर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी माजलगाव यांच्यामार्फत मा. न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालय वडवणी यांना दिनांक 17 /11/ 2021 या दिवशीची तारीख असल्यास पत्रावर नमूद आहे. यामध्ये 1) लोकसेवक असून स्वतः कशाप्रकारे आचरण करावे याबाबत कायद्यामधील तरतुदीची माहिती असताना जाणीवपूर्वक आम्हास नुकसान व्हावे या उद्देशाने कायद्याची अवज्ञा केल्याचे दिसून आले आहे‌. 2) आम्हास नुकसान पोहोचण्याचे उद्देशाने आपण लोकसेवक असतानाही चुकीचे दस्तऐवज तयार केले आहेत. 3) आपण लोकसेवक असूनही मा. पोलीस अधीक्षक बीड यांना जाणीवपूर्वक खोटी माहिती खरी आहे म्हणून पुरविली आहात.4) आपण आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करून आम्हास नुकसान व्हावे या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक बीड यांना खोटी माहिती पुरवली आहात.5) अशाप्रकारे आम्ही लोकसेवक असतानाही वरील प्रमाणे आम्हास नुकसान पोहोचविण्याचा धाक देऊन आपण भादवि कलम 166, 167, 177, 182 ब) 189 उल्लंघन केल्याचे दिसून आले अशी आमची धारणा असून सदर बाबत आपणावर गुन्हा नोंदविण्यात येऊ नये याबाबत आम्हास कळवावे अशी विनंती देखील यात केली आहे. सदरचे पत्र हे दोन्ही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या पत्राची सर्वत्र चर्चा होत आहे.

१) हे पत्र खोटे..
सदरील पत्र हे हाती लागल्यानंतर एपीआय मिरकर यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, हे पत्र सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल होत असून याबाबत मला काहीएक माहिती नाही. हे पत्र खोटे असून याची नोंद ठाण्यातील नोंद रजिस्टर ला नाही. तुम्ही ते तपासू शकता असे म्हटले आहे.

– हे पत्र मा.उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग माजलगाव यांच्यामार्फत पाठवल्याचा त्यावर उल्लेख आहे.