Home » ब्रेकिंग न्यूज » नगरपंचायतची मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार..

नगरपंचायतची मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार..

नगरपंचायतची मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार..

डोंगरचा राजा / आँनलाईन

बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी त्या त्या नगरपंचायतीचा वार्ड निहाय मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार 30 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा,शिरूर,वडवणी व केज नगरपंचायत आरक्षण सोडत नुकतीच पार पडली त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाचा दुसरा टप्पा असणाऱ्या नगरपंचायत जात निहाय मतदार यादीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे.त्या निवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2021 ची यादी गृहीत धरले जाणार आहे. नगरपंचायतीची वार्ड निहाय प्रारुप मतदार यादी 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. 23 ते 26 नोव्हेंबर अखेर त्या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे. 29 नोव्हेंबर रोजी वार्ड निहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. 30 नोव्हेंबरला मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत