Home » माझी वडवणी » महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा – मित्र मंडळ

महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा – मित्र मंडळ

महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा – मित्र मंडळ

डोंगरचा राजा / ॲानलाईन

बीड – भाजपाचे युवा नेते बाबरी शेठ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून बाबरी मुंडे यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. शुक्रवार दि.19 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नगरपंचायत व्यापारी संकुल वडवणी या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
उद्घाटन म्हणून राजा हरिश्चंद्र पिंप्री देवस्थानचे ह.भ.प भगवान महाराज राजपुत, ह.भ.प. नवनाथ महाराज चिनके, ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री, ह.भ.प. माऊली महाराज बेदरकर , ह‌.भ.प.अण्णा महाराज दुटाळ आदींची उपस्थिती लाभणार आहे.
बाबरी मुंडे मित्र मंडळाच्या माध्यमातून केलेल्या विविध सामाजिक कार्य आणि रक्तदाना मध्ये जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
आपण दिलेले रक्तदान हे कोणासाठी तरी जीवदान ठरू शकते ही सामाजिक भावना ठेवून सर्वांनी मोठ्या संख्येने या माहारक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन बाबरी मुंडे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे‌.