Home » माझा बीड जिल्हा » गावं तिथे पाणंद रस्ता करण्याचे उद्दिष्ट ! – आ. प्रकाश सोळंके

गावं तिथे पाणंद रस्ता करण्याचे उद्दिष्ट ! – आ. प्रकाश सोळंके

गावं तिथे पाणंद रस्ता करण्याचे उद्दिष्ट ! – आ. प्रकाश सोळंके

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

माजलगाव – पालकमंत्री पाणंद रस्ते योजना आढावा बैठक माजलगाव तहसील कार्यालय येथे घेण्यात आली.पाणंद रस्ते,शेत रस्ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी,या बद्दल पाठपुरावा सुरू आहे.मागील बैठकीत पाणंद रस्त्याबाबतच्या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या होता त्याचा संपूर्ण आढावा आजच्या बैठकीत घेतला गेला.गाव तिथे पाणंद रास्ता हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक गावांतून पाणंद रस्त्या बाबतचे प्रस्ताव मागून घ्यावेत.ग्रामसेवकांना हे प्रस्ताव लवकर सादर करण्या बाबतची सक्त ताकीद देण्यात यावी.या योजनेत कुठलेही गाव वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन “गाव तिथे पाणंद रस्ता” ही योजना पोचवण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रस्ताव सादर करण्या बाबत सूचना केल्या.

पाणंद रस्त्यांच्या बाबतीत अतिक्रमण आणि रस्त्याची नोंदणी करणे हे महत्त्वाचं काम आहे.त्या अनुषंगाने संबधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आढावा तयार करावा.दोन टप्प्यात पाणंद रस्त्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले या मध्ये १५ नोव्हेबरपर्यंत पहिला प्रस्ताव,२५ नोव्हेंबर दुसरा टप्पा या प्रमाणे परिपूर्ण अशे प्रस्ताव मंजुरीकरिता पाठवणे बंधनकारक आहे.

पाणंद रस्त्याचा आराखडा तयार करत असताना.एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर किमान एक हजार वृक्ष लागवड,किंवा दोन शेततळे,किंवा सात हेक्टर फळ बाग,किंवा सार्वजनिक विहीर- जल सिंचन विहीर.याचा समावेश करावा लागेल.बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक विहिरींची मागणी आहे त्याचाही आराखडा करावा.या बाबत सूचना केल्या.

प्रत्येक गावचे प्रस्ताव यावे अश्या सूचना मागील बैठकीत केल्या होत्या परंतु संपूर्ण गावांचे प्रस्ताव आले नसल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे सर्व गावांचा समावेश करून परिपूर्ण प्रस्ताव करण्याच्या सूचना देखील आ.प्रकाश सोळंके यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.