Home » ब्रेकिंग न्यूज » खा.अमोल कोल्हे परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष.

खा.अमोल कोल्हे परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष.

खा.अमोल कोल्हे परिषदेच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

पुणे – दिनांक ३१ :मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणारया ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची परिषदेची विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी मान्य केली.. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे हे उरळी कांचन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असतील.. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार असून उरूळी कांचन शिरूर मतदार संघातच येते.. अमोल कोल्हे यांनी राजा शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी अशा मालिकांमधून काम केलेले असून अमोल कोल्हे हे नाव महाराष्ट्रात सर्व परिचित झालेले आहे..
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या एका शिष्टमंडळाने आज पुण्यात खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली.. या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया परिषदेचे पुणे जिल्हा प़मुख जनार्दन दांडगे,हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब काळभोर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे पुणे जिल्हा निमंत्रक के. डी . गव्हाणे आदिंचा समावेश होता.. परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती एस.एम.देशमुख यांनी खा. अमोल कोल्हे यांना केली.. तसे लेखी पत्र त्यांना देण्यात आले.. अमोल कोल्हे यांनी ही विनंती मान्य केली..
“माझ्या मतदार संघात देशभरातून दोन ते अडिच हजार पत्रकार येणार आहेत, येणारया पत्रकारांचे स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळत आहे ही आनंदाची गोष्ट असल्याची भावना अमोल कोल्हे यांनी यावेळी बोलून दाखविली.. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खा. कोल्हे यांनी दिले”..

*संयोजन समितीची बैठक*
१८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्हयातील उरुळी कांचन येथे परिषदेचे अधिवेशन होत असून त्याच्या पूर्व तयारीची बैठक आज कोंढवा येथे घेण्यात आली.. अधिवेशन ऐतिहासिक आणि हायटेक करण्याचा निर्धार यावेळी एस.एम.देशमुख यांनी बोलून दाखविला.. बैठकीस कार्याध्यक्ष शरद पाबळे, कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया परिषदेचे जनार्दन दांडगे, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब काळभोर यांच्यासह पन्नासवर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते…