Home » ब्रेकिंग न्यूज » कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर – चेअरमन धैर्यशील सोळंके

कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर – चेअरमन धैर्यशील सोळंके

कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर – चेअरमन धैर्यशील सोळंके

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुंदरनगर कारखान्याच्या वतीने दीपावली 2021 सणा निमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी,कामगार यांना १२.५० टक्के बोनस जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके यांनी दिली आहे.

यासंदर्भात चेअरमन धैर्यशील सोळंके म्हणाले की, मागील सन २०२०-२०२१ मध्ये कारखान्याने उच्चांकी 821478 मेट्रिक टन ऊस गाळप, 50571051 युनिट वीज निर्यात आणि 11830147 लिटरचे विक्रमी इथेनॉलचे उत्पादन घेण्यासाठी कारखान्याचे सर्व अधिकारी,कर्मचारी, कामगार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुढील हंगामासाठी 12 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट व तांत्रिक क्षमता मिळविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन म्हणून कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके यांनी आज मुख्य कार्यालयात कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी,कामगार यांना दीपावलीनिमित्त 12. 50 टक्के बोनस रकमेचे वाटप तात्काळ सुरू करण्याचे आदेश कारखाना प्रशासनाला दिले आहेत.सर्व अधिकारी, कर्मचारी ,कामगार यांनी चालू हंगामात ऊस गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सतर्क राहून कामकाज करणार असून अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन कामगारांचे वतीने कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रकाश सोळंके व चेअरमन धैर्यशील सोळंके व कारखाना प्रशासनाचे आभार व्यक्त करून अभिनंदन करण्यात आले आहे.