Home » माझी वडवणी » देवडी येथे पोलीस चौकी होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

देवडी येथे पोलीस चौकी होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

देवडी येथे पोलीस चौकी होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

बीड / वडवणी तालुक्यातील देवडी येथे पोलीस चौकी सुरू करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले..

देवडी गावचे भूमीपूत्र आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मंचर येथे भेट घेतली.. यावेळी देशमुख यांनी देवडी येथे पोलीस चौकी सुरू करण्याची विनंती केली.. गृहमंत्र्यांनी लगेच ती मान्य केली..

देवडी हे गाव वडवणी पोलीस स्टेशन अंतर्गत येते.. मात्र देवडी – वडवणी हे अंतर १७-१८ किलो मिटर असल्याने आणि या मार्गावर बस व्यवस्था नसल्याने सामान्यांना पोलीस स्टेशनला जाणे अवघड होते…. देवडी परिसरात पाच – सहा मोठी गावं असल्याने पोलीस चौकी झाल्यास या गावांना फायदा होईल असेही एस.एम.देशमुख यांनी गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.. त्यामुळे आगामी काही दिवसात देवडी येथे पोलीस चौकी होईल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे..

यावेळी देशमुख यांच्या समवेत मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषदेचे माजी विभागीय चिटणीस डी. के. वळसे पाटील आदि उपस्थित होते.