Home » माझी वडवणी » मराठा क्रांती भवनासाठी जागा उपलब्ध करा – मागणी

मराठा क्रांती भवनासाठी जागा उपलब्ध करा – मागणी

मराठा क्रांती भवनासाठी जागा उपलब्ध करा – मागणी

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

बीड – वडवणी या तालुक्याच्या ठिकाणी मराठा क्रांती भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की मराठा क्रांती मोर्चा मार्फत मराठा समाज आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी संयमाने व शांततेने लढत आहे हे संघटन समाजाच्या मागण्यांसाठी निस्वार्थ भावनेने कार्यरत असून मराठा समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्‍न शासन दरबारी पडून आहेत वडवणी तालुक्यातील मराठा समाजाच्या समस्या तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी स्थिरत्व आवश्यक आहे यासाठी नगरपंचायत हद्दीतील जागा मराठा क्रांती भवनासाठी हस्तांतरित करून मराठा समाजाच्या न्याय एक लढाई सहकार्य व मराठा क्रांती लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरपंचायत मुख्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे. निवेदनावर दिनेश मस्के,संभाजी शिंदे,भारत जगताप, सुग्रीव मुंडे, शेषेराव जगताप, नवनाथ गिलबिले,सचिन सानप,शिवाजी तौर,गोविंद मस्के, हनुमंत शिंदे, सतीश गाडे, प्रमोद मस्के, शांतीलाल पवार,लक्ष्मण शिंदे, गणेश चोले, राहुल वावधाने, माऊली कदम सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.