Home » माझी वडवणी » एका फोनची तात्काळ दखल..पाणी उपलब्ध झालं.

एका फोनची तात्काळ दखल..पाणी उपलब्ध झालं.

एका फोनची तात्काळ दखल..पाणी उपलब्ध झालं.

– मुख्याधिकारी यांचे आभार – अँड.अजित देशमुख

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

वडवणी – वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला आणि निवासस्थानाला आवश्यक असणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी प्रवाहात होत होता. त्यामुळे हे पाणी प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरत नव्हते. याबाबतची माहिती अँड. अजित एम. देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी नगर पंचायत, वडवणी यांना एक फोन केला आणि दुसऱ्या दिवशी पासून नळातून येणारे पाणी उच्च दाबाने / प्रवाहाने चालू झाले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गतच्या निवासस्थानात आवश्यक असलेली मुबलक पाणी मिळू लागल्याने मुख्याधिकारी बागुल यांचे अँड.अजित देशमुख यांनी आभार व्यक्त केले आहेत.

वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याला लागून असलेले येथील कर्मचाऱ्यांसाठीचे निवासस्थान हे गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. येथे जेवढ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असायला हवा, तेवढा उपलब्ध होत नव्हता. नळातून येणारे पाण्याचे प्रेशर अत्यंत कमी असल्याने निवासस्थानाला आणि दवाखान्यात देखील अडचण निर्माण होत होती. ही बाब एका कर्तव्यदक्ष नागरिकाने अँड. अजित देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली.

देशमुख यांनी याबाबत दूरध्वनीवर संपर्क साधला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री बागुल यांचेकडे याबाबत पाठपुरावा केला. दुसऱ्या दिवशी पासून मुबलक प्रमाणात फुल प्रेशरने नळाचे पाणी वाहू लागले. आता येथील निवासस्थानात राहणारे कर्मचारी आणि रुग्णालयात येणाऱ्या जनतेला आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. हा मुद्दा जनहिताचा होता. त्यामुळे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी श्री बागूल यांना या संदर्भात धन्यवाद दिली आहेत.