Home » माझी वडवणी » युवा नेते बाबरी मुंडे यांचे नेतृत्व ; 26 अशासकीय सदस्यांनी दिले राजीनामे.

युवा नेते बाबरी मुंडे यांचे नेतृत्व ; 26 अशासकीय सदस्यांनी दिले राजीनामे.

युवा नेते बाबरी मुंडे यांचे नेतृत्व ; 26 अशासकीय सदस्यांनी दिले राजीनामे.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– वडवणी तालुक्यातील भाजपा निरंक..

– जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा,सरपंच, उपसरपंच यांचा यात समावेश..

वडवणी – वडवणी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ,सरपंच, उपसरपंच, वडवणी तालुका भाजपा पदाधिकारी यांनी युवा नेते बाबरी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक रित्या राजीनामे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कडे दिले आहेत..

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना देण्यात आलेल्या सामुहिक राजीनामा निवेदनात म्हटले आहे की,खासदार प्रीतमताई मुंडे यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात द्वेषापोटी जाणून-बुजून टाळण्यात आलेले आहे.आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतमताई मुंडे यांना पक्षात जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. व त्यांना अन्यायकारक वागणूक दिली जात आहे. त्यामुळे वडवणी तालुक्यातील सर्व सामान्य जनता ही भारतीय जनता पार्टीवर तीव्र नाराज असुन यामुळे प्रचंड संतापाची लाट भारतीय जनता पार्टी विरोधात निर्माण झालेली आहे. आम्ही आमच्या व सर्व जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही आमचे पदाचे राजीनामे देत असल्याचं सांगत आम्ही सर्व जण युवा नेते बाबरी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे दिलेल्या एकत्रित राजीनामे देत आहोत.या सामुहिक राजीनामा निवेदनात जिल्हा परिषद सदस्य अनिता राजाभाऊ मुंडे, पंचायत समिती सदस्या सौ.राणूबाई सुखदेव रेडे,साळींबा सरपंच रामेश्वर जाधव, तिगाव सरपंच बापूसाहेब अर्जुनराव शेंडगे, काडीवडगाव सरपंच बाळासाहेब तुकाराम राऊत, देवगाव सरपंच सौ मीना रामेश्वर सुरवसे, मोरवड सरपंच सौ सरस्वती ज्ञानोबा लंबाटे,हिवरगव्हाण सरपंच ईश्वर अंगदराव नाईकवाडे, खापरवाडी सरपंच सौ अनिता अनंत लंगडे, चिखलबीड सरपंच सौ अर्चना दादासाहेब मुंडे ,ढोरवाडी सरपंच सौ सविता बद्रीनाथ व्हरकटे, मोरेवाडी सरपंच सौ स्वाती दादासाहेब मोरे, दुकडेगाव सरपंच अरुण दशरथ आव्हाड, देवडी सरपंच सौ संगीता जालिंदर झाटे,कोठारबन उपसरपंच बाबासाहेब शंकर मुंडे, चिंचवण उपसरपंच बाळासाहेब आसाराम बडे, हरिश्चंद्र पिंपरी ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे,कोठारबन ग्रामपंचायत सदस्य सौ सोनाली धनराज मुंडे, उपळी सरपंच सौ सुनंदा साहेबराव सौंदरमल, उपळी उपसरपंच श्री शिवप्रसाद नंदलाल इंदानी, दुकडेगाव उपसरपंच सतिष मनोहर बडे, पुसरा ग्रामपंचायत सदस्य अशोक सटवा नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य चिंचोटी साहेबराव जालिंदर गोंडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ ज्योत्स्ना बाळासाहेब बादाडे , मोरवड उपसरपंच सौ आयोध्या भारत शेळके, मोरेवाडी उपसरपंच यशवंत काळे यांचा यामध्ये समावेश आहे.