Home » माझा बीड जिल्हा » भाजपाचे संजय आंधळे,श्रीमंत मुंडे,ईश्वर तांबडे यांनीही दिले राजीनामे..

भाजपाचे संजय आंधळे,श्रीमंत मुंडे,ईश्वर तांबडे यांनीही दिले राजीनामे..

भाजपाचे संजय आंधळे,श्रीमंत मुंडे,ईश्वर तांबडे यांनीही दिले राजीनामे..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

वडवणी – वडवणी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिका-यांचे राजीनामासत्र सुरूच असून आज पुन्हा भाजपाचे युवा नेते तथा रुई पिंपळा गावचे सरपंच संजय आंधळे यांनी आपल्या सरपंचपदाचा व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्रीमंत मुंडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ईश्वर तांबडे यांनी देखील आपल्या पदांचे राजीनामे वरिष्ठांकडे सोपविले आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे की,वडवणी तालुका हा एके काळी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून नावाजलेला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे विशेष प्रेम असलेला हा वडवणी तालुका भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. याच बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असून भाजपाच्या सर्व अशासकीय सदस्यांनी राजीनामे देण्याचे सत्र सुरू केले असून काल आणि आज अनेकांनी आपले राजीनामे बीड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपविले आहेत. आज पुन्हा वडवणी तालुक्यातील सर्व परिचित असणारे भाजपाचे युवा नेते तथा रुई गावचे सरपंच संजय आंधळे यांनी देखील आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहर प्रमुख श्रीमंत मुंडे आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ईश्वर तांबडे यांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत