Home » माझा बीड जिल्हा » जिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांचा राजीनामा.

जिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांचा राजीनामा.

जिल्हा परिषद सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांचा राजीनामा.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी- बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता राजाभाऊ मुंडे यांनी आपल्या सदस्यत्व पदाचा राजीनामा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कडे पाठवला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच जाहीर करण्यात आला.या विस्तारित मंत्री मंडळात बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खासदार डॉ.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान दिलेले नाही. तसेच मा.पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून होत असलेल्या वारंवार अन्यायाच्या विरोधात मी बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील चिखलबीड जिल्हा परिषद गटातून गत चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या बीड जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे लेखी बीड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना कळविले आहे.