Home » माझी वडवणी » अँड.अजित देशमुख यांची कोरोना सेंटरला भेट.

अँड.अजित देशमुख यांची कोरोना सेंटरला भेट.

अँड.अजित देशमुख यांची कोरोना सेंटरला भेट.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन

वडवणी – कोरोणाचे प्रमाण कमी होता होता आता ते पुन्हा दीडशेच्या आसपास पेशंट निघत असल्याने वाढत आहे. लोक अजूनही काळजी घ्यायला तयार नाहीत. वडवणी येथील कोरोणा केअर सेंटर मध्ये असलेल्या रुग्णांशी संवाद साधण्यासाठी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी सेंटरला भेट दिली.

यावेळी डॉक्टर मोराळे यांच्यासह येथील सर्व स्टाफ हजर होता. देशमुख यांनी यावेळी रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांनी न घाबरता आणि कसलीही काळजी न करता आनंदात रहावे, असा सल्लाही देशमुख यांनी अनेक रुग्णांना दिला.

वडवणी येथे सध्या कस्तुरबा गांधी कोरोना केअर सेंटर चालू आहे. येथे जवळपास पन्नास रुग्ण ॲडमिट आहेत. येथील सर्व स्टाफ चांगल्या प्रकारे लक्ष देत आहे. परिस्थिती सुधारणे आवश्यक असून रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी जनतेने शिस्त पाळणे आवश्यक आहे. मात्र जनता शिस्त पाळायला तयार नाही, हेच रस्त्याने चालताना दिसत आहे.

कोरोना पेशंटची काळजी घेता घेता येथील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे बरोबर देखील देशमुख यांनी चर्चा केली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. घाबरण्याचे अजिबात कारण नाही. औषध पाणी वेळचे वेळेवर घेत चला, असा सल्ला यावेळी देशमुख यांनी दिला.