Home » माझा बीड जिल्हा » लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखान्याचा सन्मान.

लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखान्याचा सन्मान.

लोकनेते सुंदररावजी सोळंके सह.साखर कारखान्याचा सन्मान.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

माजलगाव – संपुर्ण भारत देशामध्ये १ जुलै २०१७ पासुन वन नेशन वन टॅक्स म्हणजेच सर्व देशासाठी एकच कर अशी सुटसुटीत जीएसटी कर प्रणाली राबविण्यात आली या कर प्रणालीनुसार प्रत्येक महिन्याला,तिमाही, वार्षीक अशी विविध विवरणपत्र बिनचूक व वेळेत दाखल करावी लागतात अशा प्रकारे विवरणपत्र दाखल करीत असताना शेवटचा करउपभोक्ता यांनी भरणा केलेली कराची रक्कम व उत्पादक कंपनी यांनी भरणा केलेली कराची रक्कम आणि दाखल केलेली विवरणपत्रे एकमेकाशी जूळावी लागतात अन्यथा याचा परिणाम संस्थेला मिळणाऱ्या परतावा रकमेवर होवून विवरणपत्रा मध्ये अचुकता येणे अडचणीचे होते. कारखान्याचे संस्थापक स्व.सुंदररावजी सोळंके साहेब यांनी घालून
दिलेली आदर्श कामकाज पध्दती व मार्गदर्शक मा.आ.श्री.प्रकाशदादा सोळंके यांच्या
मार्गदर्शनाखाली आपले कारखान्याचे सर्व विभागाचे संगणकीकरण केले असल्यामूळे सर्वच आर्थीक व्यवहारामध्ये अचुकता निर्माण झालेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ३१ मार्च २०२१ ला संपणाऱ्याआर्थीक वर्षामध्ये जीएसटी द्वारे दाखल करण्यात आलेले सर्व ऑनलाईन विवरणपत्रे तसेच जीएसटी कराची रक्कम वेळेवर व बिनचूक अदा केलेली असल्याने केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय अंतर्गत केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सिमा शुल्क मंडळाकडून त्यांचे अध्यक्ष एम.अजित कुमार यांनी प्रशंसा प्रमाणपत्र देवून कारखान्यास सन्मानित केलेले आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन
श्री.धैर्यशीलकाका सोळंके यांनी दिली.