Home » माझी वडवणी » वडवणी तहसील कार्यालयावर भव्य निदर्शने

वडवणी तहसील कार्यालयावर भव्य निदर्शने

वडवणी तहसील कार्यालयावर भव्य निदर्शने

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

वडवणी – ॲट्रासिटी ॲक्ट बाबत आणि दलित समाजा विरोधात भडकावू आणि जातीयवादी बेताल वक्तव्य करणाऱ्या आ.संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा एकमेव मागणीसाठी सोमवारी वडवणी तहसील कार्यालयावर तमाम आंबेडकरी चळवळीतील समुहाने निदर्शने करण्याची हाक दिली असून वडवणी तालुक्यातील तमाम समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

वडवणी तहसीलदार आणि पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील चितोड या ठिकाणी मागासवर्गीय आणि सवर्ण या दोन गटात तणाव निर्माण झाला होता.यामध्ये शिवसेनेचे आ. संजय गायकवाड यांनी सदरील ठिकाणी भेट देऊन ॲट्रासिटी ॲक्ट आणि मागासवर्गीय समाजा विरोधात भडकावू, जातीयवादी आणि बेताल वक्तव्य केले.यामुळे समाजामध्ये प्रचंड प्रमाणात तेढ निर्माण झाला आहे.अनेक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.अशा जातीयवादी आ.संजय गायकवाड यांच्या वर निश्चितच कारवाई झाली पाहिजे.त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी वडवणी तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटना, आणि समुहाच्या वतीने दिनांक – ५ जुलै २०२१ रोजी सोमवारी सकाळी ठिक १० वाजता.वडवणी शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून तहसील कार्यालयावर पायी रॅली काढण्यात येणार आहे.तरी वडवणी तालुक्यातील तमाम समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.