Home » ब्रेकिंग न्यूज » “आर्ट ऑफ लिव्हिंग” चा उपक्रम..

“आर्ट ऑफ लिव्हिंग” चा उपक्रम..

“आर्ट ऑफ लिव्हिंग” चा उपक्रम..

जय जोगदंड / केज

– परिवारातर्फे ” उपजिल्हा रुग्णालय केजला” ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन भेट – संस्थेचे समाजोपयोगी कार्य प्रशंसनीय – डॉ.संजय राऊत ,

केज – आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार , एटलस कॉपको स्वीडन व इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅलूज यांच्या संयुक्त विद्यमाने केजच्या उपजिल्हा रुग्णालयास १० लिटर क्षमतेच्या स्वीडन निर्मित अत्याधुनिक डुल आउटलेट ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन भेट देण्यात आल्या.

सदर मशीन मध्ये एकाच वेळी दोन रुग्णांना पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता आहे.कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तीन मशीन भेट दिल्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयाच्या चिकित्सा व्यवस्थेला मोलाची मदत लाभणार आहे व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे समाजोपयोगी कार्य प्रशंसनीय आहे असे गौरवोदगार उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.संजय राऊत यांनी वितरण प्रसंगी काढले.

देशातील कोविडच्या गंभीर परिस्थिती पाहता ऑक्सिजन सह संसाधनांची कमतरता पाहता आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार ,

ऐटलस कॉपको व इंटरनॅशनल अससोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्युज यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर ,ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आदींसह जीवनरक्षक प्रणालींचे मदत म्हणून वाटप करण्यात येत आहे ,यासाठी रुग्णालयांची गरज नोंदवून पुरवठा करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक व IAHV चे सदस्य सचिन फपाळ यांचे सहकार्य लाभत आहे .

याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय राऊत यांच्याकडे तीन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आर्ट ऑफ लिव्हिंग केजचे डॉ.वैजनाथ शेटे यांनी सुपूर्द केले यावेळी डॉ.करपे ,डॉ.दत्तात्रय चाटे ,डॉ.बलासाहेब सोळुंके ,डॉ. शशांक वाघमारे ,डॉ.सुषमा शेटे ,डॉ.तेजश्री चाटे ,रक्तपेढी अधिकारी श्रीकृष्ण नागरगोजे यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंग चे वसंत तरकसबंद ,जयश्री कोकीळ ,अँड.रमेश खंदारे ,बाळासाहेब देशमुख यांनी प्रमुख उपस्थिती होती.तसेच या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रॅटेर मुळे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना याचा लाभ होणार व पर्यायाने ऑक्सिजनची गरज भागण्यास मदत होणार आहे,असेच समाजोपयोगी कार्य आपल्या हातून घडावे असे मनोगत उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.संजय राऊत यांनी व्यक्त केले.