Home » माझा बीड जिल्हा » वडवणी शहरात नव्या चार कोविड सेंटरसाठी २३० बेड संख्येस मंजुरी

वडवणी शहरात नव्या चार कोविड सेंटरसाठी २३० बेड संख्येस मंजुरी

वडवणी शहरात नव्या चार कोविड सेंटरसाठी २३० बेड संख्येस मंजुरी

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

वडवणी – वडवणी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आज मोठ्या प्रमाणावर ॲडमिशन झाले असून नागरिकांनी गंभीरपणे दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच प्रशासनाने सदर प्रकरणी गंभीर दखल घेत वडवणी शहरात नव्याने चार कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आज तब्बल ५५  ते ६० कोरोना बाधीत रुग्णांची भरती झाली आहे.वडवणी शहर आणि तालुक्यातील हे रुग्ण असुन कोरोना बाधित आकडेवारी मध्ये वडवणी तालुक्याचा नंबर सर्वात शेवटी होता आता तो वेगानं पुढे जात असुन शहर आणि तालुक्यातील तमाम जनतेने या बाबतीत गंभीर दखल घेत आपण आपल्या कुटुंबासोबत घरीच राहण्याची गरज आहे.प्रत्यक्षात वडवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये १०० रुग्णांच्या आतच व्यवस्था करण्यात आलेली असताना आता मात्र ही रुग्ण संख्या १०० च्या वर सरकली असल्याने संबंधित रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्याची नितांत गरज होती.वडवणी तहसील प्रशासनाने वेळीच दखल घेत शहरातील बन्सीधर मुंडे विद्यालय, त्रिमुर्ती मंगल कार्यालय, राजश्री शाहू विद्यालय आणि आनंद मंगल कार्यालय ही चार कोविड केअर सेंटर सुरू केली असून यामध्ये प्रत्येकी ५० – ३० – ६० – ९० अशी एकूण २३० बेड संख्या ची याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.