Home » महाराष्ट्र माझा » “धस” बस नाम ही काफी हैं..

“धस” बस नाम ही काफी हैं..

“धस” बस नाम ही काफी हैं..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

बीड – २४ तास चौकन्ना आमदार सुरेश आण्णा…
हॕलो डाॕक्टर साहेब सुरेश धस बोलतो थोडी चर्चा करायची होती….तुम्ही सर्वजण कोव्हीड सेंटर चालणविणारे कधी वेळ देता…अण्णा तुम्ही सांगाल ती…चालेल राञी साडेदहा वा.यायला जमेल ना सर्वांना….हो अण्णा….
तुम्हाला बोलवण्याचे कारण एकच सद्यस्थितीत माझे अनेक डाॕक्टर मिञ तुमच्याप्रमाणेच या कोवीड मध्ये काम करत आहेत.त्यांच्याशी तुम्हाला आणि तुमच्याशी त्यांना म्हणजे विचारांची देवाणघेवाण करता येऊन कशापद्धतीने आपल्या कार्यप्रणालीचा वेग वाढविता येईल यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी मी एक झुम मिटींग तुमच्यासोबत अरेंज केलेली आहे.यासाठीच तुम्हाला बोलावलय…ये कर बाबा झुममिट सुरु….झुममिट मध्ये एकमेकांशी सर्व डाॕक्टरांनी आपआपल्या पद्धतीने परिस्थीती नियंञणात आणण्यासाठी कसे सहकार्य मिळेल आणि अण्णांचे मार्गदर्शक एक आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय असते ते कसे हाताळले गेले पाहिजे हा त्यांचा अनुभव आपल्यासारख्यांचा उत्साह वाढविणारा ठरतो आहे म्हणत झुममिट संपली….ओ अण्णा…बोलाना डाॕक्टरसाहेब…रेमडिसीवरची नितांत गरज आहे…किती लागतील…एवढे एवढे हवेत सर्वांनाच हवे आहेत….ओके थोड थांबा….अण्णांनी फोन हातात घेतला ज्यांना बोलायचे त्यांना बोलले आणि फोन बंद करत डाॕक्टरसाहेब काळजी नका करु रेमडिसीवर घेऊन माणूस पहाटेपर्यंत आपल्यापर्यंत येईल….तोपर्यत वेळ झाली राञीचे 11:45 ची.
अण्णा धन्यवाद तुम्हीच हि प्रशासकीय यंञना हादरुन सोडवू शकतात,तुम्हीच अशा कठीण परिस्थीतीत मदत व पुनर्वसन काय असते हे आम्हा डाॕक्टरांना दाखवून देत आहात…तो पर्यंत अण्णांनी ज्यां विभागाला पञ लिहायचे होते ते स्वताःच्या हस्ताक्षरात लिहिले.डाॕक्टरांना सांगितले या तुम्ही पहाटेपर्यंत रेमडिसीवर येतील सर्वांना जितके पाहिजे तेवढे घ्या.अत्यावश्यक रुग्णांना आधी द्या काळजी करु नका 200 रेमडिसीवर घेऊन माणूस निघालाय……खरच अण्णा 200 रेमडिसीवर,मान गये बाॕस म्हणत डाॕक्टर निघून गेले.परत हॕलो आ.सुरेश धस बोलतो,माझा माणूस तुमच्यापर्यंत येतोय रेमडिसीवर तयार ठेवा….हो साहेब…..तोपर्यत राञीचे 1:15 वाजलेले…हॕलो तहसिलदार साहेब,रेमडिसीवर घेऊन माणूस येईल पहाटेपर्यंत…हो साहेब….
तोपर्यंत कारखेल येथे एका रुग्णाला ञास होतोय अण्णा असा फोन आला.मला त्याचा नंबर एसएमएस करा हो अण्णा…..हॕलो सुरेश धस बोलतोय……हा बोलाना अण्णा,….अरे बाबा तुला ञास होतोय ना…..हो अण्णा……घाबरु नको तुझ्याकडे गाडी आहे का चारचाकी……नाही अण्णा….बर थोड थांब मी माझ्या सरपंचाला फोन करतो….हॕलो सरपंच….हा अण्णा……अरे बाबा ते तुझ्या गावात अमूक अमूक नावाचा इसम आहे त्याला गावातून आत्ताच्या आत्ता गाडीत टाक आणि ग्रामीण रुग्णालयात आण त्याला ञास होतोय अस म्हणतोय तु उठ बर पटकन आन ये घेऊन त्याला…..हो लगेच अण्णा…
तोपर्यत राञीचे 2:20 वाजलेले.
परत फोन वाजला हा बोल…..अण्णा मी निघालोय रेमडिसीवर घेऊन पहाटेपर्यंत येतो….हो बाबा ये पण येताना एखादा ड्रेस घेऊन ये म्हणजे आल्यावर थोडावेळ इथेच माझ्याघरी झोप सकाळी आवरून जेवण करुन मग निघ…नाही तस काही नाही अण्णा….आर गप तु ड्रेस घेऊन ये मी तस नसतो जाऊ देत तुला एवढ्या रातच निघलास बेट्या….अण्णा तुमच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे…..बर वेळ नको घालू तु निघ बर लवकर…..हो अण्णा….
आणि आज शनिवारी पहाटे 5 वा.रेमडिसीवर आष्टी शहरात दाखल होताच अण्णा,तहसिलदार यांनी ग्रामीण रुग्णालयात ते नेऊन दिले.आणि सांगितले जे कोवीड सेंटर चालवितात त्यांच्यासाठी द्या.
वरील सर्व प्रक्रियेचा मी साक्षीदार आहे.हे सर्व पाहून एकच लक्षात येते कि,सुरेश धस नामक व्यक्ती हि काय चीज आहे.ज्या माणसात काम करण्याची धमक आणि प्रबळ इच्छाशक्ती असते ना तो कठीण प्रसंगात कशाचीच पर्वा न करता मला फक्त काम आणि कामच करायचय हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन काम करणारे नेतृत्व म्हणजे आ.सुरेश धस आहे.
पद येते जाते,सत्ता येते जाते म्हणून काय कोणी जनतेशी जुळलेली नाळ कधीच तोडू शकत नाही.कामाच्या प्रति तळमळ आणि तडफड काय असते ती सुरेश धस नावातच आहे.म्हणूनच वारंवार म्हणावस वाटत….
“धस” बस नाम ही काफी हैं..

Leave a Reply

Your email address will not be published.