ताईंचा एक फोन;मध्यप्रदेशात मराठी रुग्णाला भेटला बेड.
– डोंगरचा राजा / ॲानलाईन.
मध्यप्रदेश राज्यात होश्यागाबाद येथील रहिवाशी राहुल टेकाडे यांच्या वडीलांना कोरोणा झाला असता त्यांनी त्या ठिकाणच्या विविध दवाखान्यामध्ये संपर्क केला असता सर्व दवाखाने रुग्णांनी गच्च भरल्याचे सांगण्यात आले आणि त्यांना सध्यातरी बेड भेटणार नाही आशी गंभीर समस्या निर्माण झाली असता त्यांनी माजलगाव येथील समता काॅलनी येथील आपल्या मेव्हणे अनंत कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला त्यांनी त्यांच्या प्रभागातील कार्यक्षम उपनराध्यक्ष प्रतिनिधी दिपक माणिकराव मुंडे यांच्या मार्फत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पंकजाताई यांना सर्व परिस्थिती सांगितली व ताईंनी क्षणाचाही विलंब न करता मध्यप्रेदश राज्याचे आरोग्यमंञी मा.श्री.विश्वास सारंग यांना सांगितले त्यांच्या फोनची दखल घेत आरोग्य मंञ्यानी होश्यागाबादच्या कलेक्टर यांना सुचना केली असता होश्याबादच्या तहसीलदारांचा राहुल टेकाडे यांना फोन आला असता त्यांच्ये वडिल नामदेव टेकाडे यांना तात्काळ तेथील नर्मदा हाॅस्पिटल मध्ये बेड उपलब्ध होऊन उपचार सुरु झाले.त्यांच्या या कार्याने टेकाडे व कुलकर्णी परीवार भारावुन गेला आहे आणि नामदेव टेकाडे यांना योग्य वेळी उपचार भेटल्याने एका मराठी माणसाचे प्राण पंकजाताई मुंडे यांच्या एका काॅलने वाचले. स्वा.गोपिनाथराव मुंडे साहेबांचा वारसा त्या सक्षमपणे चालवत असल्याची प्रचीती सर्वांना झाली आहे.