Home » महाराष्ट्र माझा » खा.प्रितमताई थेट कोवीड वार्डात;रुग्णांना मानसिक दिलासा.

खा.प्रितमताई थेट कोवीड वार्डात;रुग्णांना मानसिक दिलासा.

खा.प्रितमताई थेट कोवीड वार्डात;रुग्णांना मानसिक दिलासा.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– येथे पाहिजे जातीचे , येरा गबाळ्याचे काम नोव्हे..

– ठाकरे सरकारचे मंत्री आशा धाडसा भुमीकेचा आदर्श घेणार का ?

बीड – राजकारणात काम करतांना लोकप्रतिनिधीच्या अंगात हिमंत असेल आणि संकटात सापडलेल्या लोकांना मदत करायची असेल तर अस नेत्रत्व घरात न बसता मदतीला धावून जाते , वाढत्या करोनाच्या संकटात पीपई किट घालून थेट रुग्णांची भेट घेणारा ठाकरे सरकारचा एकही मंत्री दिशत नाही , मात्र स्वःताचा जिव धोक्यात घालतांना खा डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडेनी राजकिय नाटक न करता बीडचा जिल्हा रुग्णालयात सुरक्षीत काळजी घेत थेट कोवीड वार्डात प्रवेश केला आणि रुग्णांची अस्थेवाईक चौकशी दिलासा दिला . संकटात आपल्या जनतेसाठी हि भुमीका प्रेरणादायी असून येथे पाहिजे जातीचे , येरा गबाळ्याचे काम नोव्हे अस म्हटले तर चुकिच ठरणार नाही , आम जनतेसाठी सुःख दुःखात धावून येणारा पुढारी त्याला आम जनता देवासमान मानते हे नक्कीच.
बीड जिल्ह्यात कोरणा संकट मोठ्या प्रमाणावर वाढलं असून ग्रामीण भागासह शहरात धुमाकूळ घातला आहे .अंबाजोगाई बीड आष्टी परळी माजलगाव केज सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि बीड जिल्ह्यातील संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम ताई यांनी काल पासून संपूर्ण जिल्ह्यात दौरा सुरू केला. काल त्यांनी बीड जिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष भेट दिली, आरोग्य यंत्रणेची पाहणी करून रुग्णांना दिले जाणारे जेवण, इतर सुविधांची सर्व माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा चिकित्सक यांच्या यंत्रणेकडून घेतली. स्वतः डॉक्टर असलेल्या खासदारांनी आवश्यक काही सूचना प्रशासनाला केल्या .मात्र हे सारं करत असताना आजच्या संकटात राज्यात एकही मंत्री किंवा इतर पुढारी पीपई कीट घालून थेट रुग्णांच्या वार्डात गेलेलं कानावर येत नाही. पण महाराष्ट्रात एकमेव खासदार ज्यांनी काल जिल्हा रुग्णालयात को वीड सेंटरची पाहणी करताना पिपई कीट घातले आणि थेट को वीड रुग्णांशी संवाद साधला. राजकारणात धाडस लागतं, हिम्मत लागते, आणि ते जर असेल तर जनतेवर संकट आलं की असं नेतृत्व घरात कधीच बसत नाही. कोवीड वातावरणात अलीकडे राजकारणातील मंडळी राजकारण करण्यासाठी अनेक नाटकं करताना दिसतात. पण प्रत्यक्ष जनतेच्या सुखदुःखात जाऊन चौकशी करणे हा खरा मानवतेचा धर्म आहे. खरतर खासदारांचा आदर्श राजकीय पुढार्‍यांनी घ्यायला हवा .कारण रुग्णांची मानसिकता भयभीत झालेली असते अशावेळी आपला माणूस आपल्या जवळ येतो, आणि संवाद साधतो , आम जनतेसाठी रुग्णासाठी देवाच्या स्वरूपात भेटला असं वाटतं. प्रीतम ताई च्या भूमिकेचं कालपासून संपूर्ण जिल्ह्यात स्वागत होत असून अजूनही तीन दिवस त्या जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुकास्तरावर भेट देऊन आरोग्य यंत्रणेची पाहणी करणार आहेत. स्वतः डॉक्टर असल्याचा फायदा जिल्हा आरोग्य यंत्रणेला मोठ्या प्रमाणावर होत आहे. बीड जिल्ह्यासाठी यापूर्वी केंद्रातून त्यांनी आवश्यक तेवढे व्हेंटिलेटर पाठवलेले आहेत .आता लसीचे डोस संपले तात्काळ त्यांनी केंद्राकडे संपर्क साधून लसीचे डोस आणले. ज्यामुळे लसीकरण जिल्ह्यात सुरू झाल आहे. एकूणच काय तर अशी भूमिका राजकारणी लोक जर घेऊ लागले तर खऱ्या अर्थाने संकटात लोकांना दिलासा मिळतो. प्रीतम ताई महिला नेतृत्व असतानाही एवढी खंबीर भूमिका घेऊ लागल्या त्याचं कौतुक सर्वांना वाटत आहे. कधीकधी जिल्ह्याच्या राजकारणात खासदाराच्या लोकप्रियतेचं कारण काय? असा प्रश्न जेव्हा मनात पडतो तेव्हा हीच त्यांची भूमिका अठरापगड जाती-धर्माच्या लोकांची मनं जिंकणारी आहे हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published.