Home » माझा बीड जिल्हा » पत्रकारांना वृत्तसंकलनासाठी सवलत द्यावी – चौरे

पत्रकारांना वृत्तसंकलनासाठी सवलत द्यावी – चौरे

पत्रकारांना वृत्तसंकलनासाठी सवलत द्यावी – चौरे

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची प्रशासनाकडे मागणी

बीड – १ मे पर्यंत जिल्ह्यात संचार बंदी लागू असून याकाळात प्रशासनाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सवलत दिली आहे पण जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतके अधिस्वकृत पत्रकार असल्याने अनेक पत्रकारांकडे अधिस्वीकृती नाही आणि त्यांना नियमित वृत्तसंकलन करण्यासाठी बाहेर जावे लागते तेव्हा जिल्हा प्रशासनाने काही नियम घालून पत्रकारांना या संचारबंदीच्या काळात सवलत द्यावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक आणि जिल्हा माहिती अधिकारी याना निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनात म्हटले आहे कि दि 15 एप्रिल पासून राज्यभर संचारबंदी आदेशाचे पालन होणार आहे. शहरातही त्याचे पालन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांनी काल रात्री फेसबुक live वर बोलताना संचारबंदी काळात राज्यातील “अधिस्वीकृती पत्रकार” यांना सवलत असा शब्दाचा वापर केला आहे. बीड शहर आणि जिल्ह्यात विविध वर्तमानपत्र, टीव्ही व इतर प्रसार माध्यमामध्ये सुमारे 200 च्या जवळपास पत्रकार व वर्तमानपत्राच्या कार्यालयात काम करणारे प्रतिनिधी(फोटोग्राफर, ऑपरेटर,इत्यादी) कार्यरत आहेत.यापैकी केवळ 20 ते25 व्यक्तीकडे “अधिस्वीकृती पत्र” आहे.त्यामुळे अनेक वर्तमानपत्र व इतर प्रसार माध्यमांना रिपोर्टिंग व माध्यमांचे काम करणे अशक्य होणार आहे.तरी आपणाकडे विनंती करण्यात येते की प्रसार माध्यमाकडे काम करणाऱ्या प्रतिनिधींना(पूर्वीच्या लॉकडाऊन काळातील पध्दतीप्रमाणे)त्यांच्या स्वतःच्या कार्यालयाचे ओळखपत्र पाहून शहरात काम करण्यास परवानगी मिळावी.( जे पत्रकार नाहीत पण याकाळात फिरता यावे म्हणून तात्पुरते ओळखपत्र घेतले, पत्रकार कोण आहेत अन कोण नाहीत हे आपल्या विभागाला ठाऊक आहे ते वगळून)तसे पत्र आपणाकडूनसंबंधित विभागाला देण्यात यावे ही विनंती अशी मागणी जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक ,जिल्हा माहिती अधिकारी याना बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे ,विभागीय सचिव विशाल साळुंके ,जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे ,कार्याध्यक्ष दत्ता आंबेकर ,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक साहस आदोडे चंद्रकांत साळुंके आदीने केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.