Home » माझा बीड जिल्हा » परळीत 25 दुचाकींचा 17 एप्रिल रोजी लिलाव.

परळीत 25 दुचाकींचा 17 एप्रिल रोजी लिलाव.

परळीत 25 दुचाकींचा 17 एप्रिल रोजी लिलाव.

परळी वैजनाथ / प्रतिनीधी

परळी वैजनाथ – वेगवेगळ्या कारणास्तव जप्त करण्यात आलेल्या परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथील 25 दुचाकींचा लिलाव दि.17 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. कोरोनाचे सर्व नियम पाळून केला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे व सपोनि विशाल शहाणे यांनी सांगितले.
परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक वर्षांपासुन वेगवेगळ्या कारणास्तव मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या.या मोटारसायकली ज्यांच्या कुणाच्या असतील त्यांनी आवश्यक कागदपत्रे दाखवुन घेवुन जाव्यात याबाबत परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतिने जाहिर करण्यात आले होते.परंतु 25 मोटारसायकल घेवुन जाण्यास अद्याप कुणी आले नसल्याने या मोटारसायकलींचा दि.17 एप्रिल रोजी सकाळी 10 वा.ग्रामीण पोलिस ठाणे परळी येथे लिलाव करण्यात येणार असुन मान्यताप्राप्त भंगार दुकान मालकांनी अनामत रक्कम भरुन व कोरोनाचे सर्व नियम पाळून लिलावात सहभागी व्हावे तसेच ज्यांच्या या मोटारसायकल आहेत त्यांनी दि.16 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात कागदपत्रे जमा करुन आपली मोटारसायकल घेवुन जावी. सदरच्या मोटरसायकलची माहिती पोलीस ठाणे येथे नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. अन्यथा दि.17 एप्रिल रोजी जाहिर लिलाव करण्यात येईल असे आवाहन पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे व नोडल अधिकारी सपोनि विशाल शहाणे मो. नं.+91 94206 66668 यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.