Home » महाराष्ट्र माझा » शेतकरी अडचणीत आणला.- प्रवक्ते राम कुलकर्णी.

शेतकरी अडचणीत आणला.- प्रवक्ते राम कुलकर्णी.

शेतकरी अडचणीत आणला.- प्रवक्ते राम कुलकर्णी.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

– ठाकरे सरकारच्या कृषी खात्यानी करोना संकटात शेतकरी अडचणीत आणला. – प्रवक्ते राम कुलकर्णी

– पीयूशी पाईपात भरमसाठ वाढ , जैन , पारस , फिनोलेक्स , सुप्रीम , उत्पादण कंपन्याची मनमानी.

अंबाजोगाई – करोनाच संकट समोर असतांना केंद्र सरकारने रासायनिक खताच्या किमती मध्ये झालेली दरवाढ रोखली असताना राज्यात ठाकरे सरकारच्या कृषी खात्याच्या आर्शीवावाने शेती पाईप उत्पादण करणाऱ्या कंपन्याना दरवाढी साठी मुभा दिल्याने नामांकित पाईप उत्पादण कंपन्यानी प्रचंड दरवाढ करुन शेतकऱ्यांना संकटात वेठीस धरले आहे . वाढलेले दर कमी करुन शेतकऱ्यांना सिंचना साठी संकटात मदत करण्याची मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली , 3 इंची pvc पाईप 700 रुपयाला मिळायाचा , नवीन दरामुळे आता 926 ला मिळत आहे
प्रसार माध्यमासाठी काढलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि गतवर्षी पासून जगाच्या पाठीवर करोना संकट आहे , ज्यामुळे देशाच अर्थचक्र कोसळून गेल . मात्र आशा संकटात आमचा बळीराजा बांधावर काबाड कष्ठ करुन उत्पादण घेतले देशाच्या अर्थव्यवस्थेला अधार देण्याच काम शेतकऱ्यांनी केल . या संकटात यंदा रासायनिक खताची निर्मिती करणाऱ्या कंपन्यानी प्रचंड दरवाढ केली होती . मात्र केंद्र सरकारच्या कृषी मंत्यानी दरवाढ न करण्याची तंबी दिली . महाराष्ट्रात महाविकास अधाडीच सरकार हेच मुळात शेतकऱ्यांच्या विरोधात आहे . कृषीमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांचा बांधावर जाण्याच नाटक करतात मात्र आशा उत्पादन करणाऱ्या कंपन्या मनमानी दरवाढ करून मुग गिळून गप्प का बसतात ? असा सवाल कुलकर्णी यांनी केला . यंदा पाउस प्रचंड झाला .पाणी मुबलक आहे मात्र pvc पाईप उत्पादण करणाऱ्या कंपन्यानी अवाच्या भावात दरवाढ करून शेतकऱ्यांना संकटात वेठीस धरले आहे . दरवाढी मुळे शेतकरी आपल्या शेतात पाईप लाईन करू शकत नाही .090×4 या पाईपचे नवीन पर 926 एवढे आहेत . अर्थात नाही म्हटले तरी पाईप मागे 25% दरवाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे . या दरवाढीला महावसुली सरकारचे कृषीमंत्री पुर्णतहा जबाबदार असून विभागवार खरिप आढावा बैठका घेण्या अगोदर मंत्री दादा भुसे यांनी कंपन्यानी केलेली दरवाढ रद्द करावी अशी मागणी राम कुलकणी यांनी केली , जैन असो किंवा पारस या सर्व उत्पादण कंपन्या महाराष्ट्रातच आहे

Leave a Reply

Your email address will not be published.