रमेश गायसमुद्रे यांचे निधन.!
केज / जय जोगदंड
केज – तालुक्यातील साळेगाव येथे रमेश गायसमुद्रे यांचे ब्रेन ट्यूमरच्या आजाराने निधन झाले.
या बाबतची माहिती अशी की, साळेगाव येथील सेवानिवृत्त फौजदार कालकथित प्रभाकर गायसमुद्रे यांचे चिरंजीव रमेश प्रभाकर गायसमुद्रे यांचे दि. ८ एप्रिल रोजी दुपारी ३:१५ वा. निधन झाले. मागील काही महिन्या पासून त्यांच्यावर सोलापूर येथील डॉ. वळसणकर यांच्या रुग्णालयात ब्रेन ट्युमरवर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचे ब्रेन ट्यूमरवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या अन्न नलिकेचीही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे ते काही काळ कोमात गेले होते.
दरम्यान त्यांना दि. ७ एप्रिल रोजी साळेगाव येथे आणण्यात आले होते. दि. एप्रिल रोजी त्यांचे त्यातच निधन झाले. त्यांना एक मुलगा व मुली सून आणि जावई आई व पत्नी असा परिवार आहे. रमेश गायसमुद्रे हे समाजशास्त्रातील पदव्युत्तर होते. ते अत्यंत संयमी आणि शांत स्वभावाचे होते.