मा.आ.आंधळे यांच्या वतीने बँकेत सँनेटाईजर,मास्कचे वाटप.
– डोंगरचा राजा / ॲानलाईन.
वडवणी – वडवणी शहरातील स्टेट बँक आँँफ इंडिया येथील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष तथा माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या वतीने सँनेटाईजर व मास्कचे वाटप करण्यात आले.
आज संपूर्ण देशासह महाराष्ट्रात हि कोरोना या महामारीने थैमान घातले असुन या सुलतानी संकटात सर्व राजकीय ,सामाजिक व्यक्ती हे आप आपल्या परिने सहकार्य करत आहेत यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी हे जिवाची पर्वा न करता शासकीय कर्तव्य पार पाडत कोरोना योध्दा म्हणून काम करत आहेत यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, बँक अधिकारी कर्मचारी, महावितरण अधिकारी, कर्मचारी हे काम करत आहेत तरी वडवणी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील अधिकारी कर्मचारी यांना माजी आमदार केशवराव आंधळे यांच्यावतीने सँनेटाईजर व मास्कचे वाटप करण्यात आले हे साहित्य बँक व्यवास्थापक मयुर काशीद यांच्या कडे देण्यात आले यावेळी मा.शिवसेना तालुका प्रमुख विनायक मुळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव सावंत हे उपस्थित होते.