Home » ब्रेकिंग न्यूज » नगरसेवकांसाठी मार्गदर्शक उपक्रम – ना.धनंजय मुंडे

नगरसेवकांसाठी मार्गदर्शक उपक्रम – ना.धनंजय मुंडे

नगरसेवकांसाठी मार्गदर्शक उपक्रम – ना.धनंजय मुंडे

परळी l प्रतिनिधी

– पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन.

परळी वैजनाथ – परळी वैजनाथ नगर पालिकेचे शिक्षण क्रीडा आणि सांस्कृतिक सभापती गोपालकृष्ण रावसाहेब आंधळे यांनी मागील कार्यकाळात केलेल्या कामांचा कार्य अहवाल राज्याचे सामाजिक न्याय, विशेष सहाय्य व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला. यावेळी ना.धनंजय मुंडे यांनी गोपाळ आंधळे यांच्या उपक्रमाची प्रशंसा करत हा उपक्रम जिल्ह्यातील इतर नगरसेवकांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी आशा व्यक्त केली.
2016 साली झालेल्या नगर पालिका निवडणुकीत राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर जी जी कामे प्रभागात आणि शिक्षण समितीच्या अंतर्गत पूर्ण झालेली आहेत, त्या सर्व कामांचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. याबद्दल गोपाळ आंधळे म्हणाले की ना.धनंजय मुंडे साहेब आणि नगर पालिकेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहराचा कायापालट होईल असा विकास झाला आहे. अनेक कोटींचा निधी प्रत्येक प्रभागासाठी उपलब्ध झाला असून, रस्ते, नाल्या, स्वच्छतासह नागरिकांच्या मूलभूत विकास साध्य झाला आहे. या सर्व बाबींचा उल्लेख असलेला कार्य अहवाल आज मी ना.धनंजय मुंडे यांना सादर केला असल्याचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी सांगितले.
शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी ना.धनंजय मुंडे यांना सादर केलेल्या कार्य अहवाल प्रकाशन प्रसंगी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, जिल्हा बँकेचे संचालक सूर्यभान नाना मुंडे, पाणी पुरवठा सभापती पती गोविंद मुंडे, नागापुरचे सरपंच मोहनराव सोळंके, युवक नेते माणिकभाऊ फड, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, मराठवाडा साथी पीसीएन न्यूजचे संपादक मोहन व्हावळे, टीव्ही 9 चे प्रतिनिधी संभाजी मुंडे, महादेव गित्ते, कार्य अहवालाचे प्रकाशक मोहन साखरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.