Home » माझा बीड जिल्हा » “दिव्यांगसाथी” या संकेतस्थळावर नोंदणी करा – राजेंद्र लाड.

“दिव्यांगसाथी” या संकेतस्थळावर नोंदणी करा – राजेंद्र लाड.

“दिव्यांगसाथी” या संकेतस्थळावर नोंदणी करा – राजेंद्र लाड.

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

समाजकल्याण विभाग आणि जिल्हा परिषदेचा संयुक्त उपक्रम.

आष्टी – दिव्यांग व्यक्तींची स्वतंत्र जनगणना असायला पाहिजे,दिव्यांगांची त्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आकडेवारी असायला पाहिजे,दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी,प्रमाणपत्र याचबरोबर दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देणे सुकर करण्याच्या उद्देशाने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ” दिव्यांगसाथी’ ” या विशेष संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.अशी माहिती शासन मान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिव्यांग हितार्थ दिली आहे.
या संकेतस्थळावर जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी करणे सुरु असून ग्रामीण भागातील स्थानिक अंगणवाडी ताई यांच्या मार्फत नोंदणी केली जात आहे.तर नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांची नोंदणी स्थानिक दिव्यांग शाळेतील शिक्षकांमार्फत करण्यात येत आहे.तरी आपल्या तालुक्यातील दिव्यांग शाळेत नोंदणी चालू असून तेथे संपर्क करुन नोंदणी करावी.बीड शहरातील दिव्यांग बांधवांनी जि.प.समाजकल्याण कार्यालय बीड येथे सकाळी १० ते ५ या वेळेत संपर्क करुन नोंदणी करावी.कारण यापुढील सर्व शासकीय योजना या संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणार आहेत.यापुढे प्रत्येक वेळेस दिव्यांगांना नवीन अर्ज किंवा माहिती देण्याची गरज भासणार नाही.यामुळेच ही नोंदणी करणे आवश्यक आहे.यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संघटनांनी दिव्यांगांची नोंदणी करण्यासाठी सहकार्य करुन प्रत्येक दिव्यांगांची नोंदणी करवून घ्यावी.नोंदणी करत असतांना कोवीड – १९ संदर्भातील नियमांचे तंतोतंत पालन करावे.असेही आवाहन समाजकल्याण बीड चे दिव्यांग स्थानिक स्तर समितीचे सदस्य राजेंद्र लाड यांनी केले आहे.
यामध्ये प्रामुख्याने त्यांचे आधार कार्ड,बँक खाते,आँनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आदी बाबींचा समावेश असेल.जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी दिली.
या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी करून,आँनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना ५ टक्के खर्च निधी योजना,विमा,पेंशन,एसटी – रेल्वे पास इत्यादी योजनांचा लाभ मिळवून देणे,पात्र लाभार्थींना स्वावलंबन कार्ड मिळवून देणे,तपासणी व ऑनलाईन नोंदणी,तसेच आरोग्यविषयक सेवा मिळवून देणे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे.
अशा प्रकारचे संकेतस्थळ असावे अशी इच्छा ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती,त्याला प्रतिसाद देत त्यासाठी सर्वात प्रथम बीड जिल्ह्यातील समाज कल्याण च्या व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे संकेतस्थळ आकाराला आणले आहे.
दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण सह शहरी भागातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंद घ्यावी,सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत विभागाची प्रत्येक योजना पोचवण्यासाठी मदत व्हावी असे चोख नियोजन करून हा उपक्रम राबविण्यात यावा,अशा सूचना ना.धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.बीड जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी दिव्यांगसाथी हे संकेतस्थळ निर्माण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा बीड च्या वतिने ना.धनंजय मुंडे,बीड जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार,समाजकल्याण सहाय्यक आयुक्त डाँ.सचिन मडावी यांचे अभिनंदन करुन आभार प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.