Home » विशेष लेख » केंद्रातून येणारा निधी;खा.डॉ.प्रितमताईची कार्यक्षमता..

केंद्रातून येणारा निधी;खा.डॉ.प्रितमताईची कार्यक्षमता..

केंद्रातून येणारा निधी;खा.डॉ.प्रितमताईची कार्यक्षमता..

– डोंगरचा राजा / ॲानलाईन.

बीड – मागच्या आठ दिवसापासुन बीड जिल्ह्याच्या राजकारणात एक विषय गाजत आहे. तो म्हणजे केंद्रातुन येणारा विकास निधी.केंद्रात भाजपाची सत्ता आहे आणि राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या खासदार आहेत. त्यामुळे केंद्रातला पैसा कुणामुळे आला? हा प्रश्न अगदी जनावरे सांभाळणारा माणुससुद्धा सहजपणे सांगु शकेल. पण राजकारणात लोकांची दिशाभुल करण्यासाठी श्रेय घ्यायचं आणि माध्यम हाताशी धरून उदो उदो करणाऱ्या बातम्या पेरायच्या ही सवय अलीकडच्या काळात राजकिय पुढाऱ्यांना लागली आहे. जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे ह्या आपल्या जेष्ठ भगिनी माजी मंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काम करतात. मुंडे भगिनींचा अजिंडा विकासाशिवाय दुसरा काहीच नाही. न भुतो न भविष्यति असा निधी पंकजाताईच्या काळात बीड जिल्ह्यात आला. रेल्वेचा प्रश्न असेल किंवा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न असेल ज्या खासदाराच्या पुढाकाराने नाही म्हटलं तरी कोटीचा महापुर बीड जिल्ह्यात आला. त्याच खासदारांनी महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका भेटीत परळी-गंगाखेड रस्ता असेल किंवा बायपास रस्ता असेल बीड शहरातील रस्ते असतील किंवा केंद्रिय मार्ग निधी असेल यासाठी कोट्यावधी रूपये मंजुर करून आणले. 100 टक्के श्रेय खासदारांना जातं. मात्र असं असताना बीड जिल्ह्यातले पुढारी जे भाजप विरोधक आहेत केंद्राच्या पैशावर श्रेयवादाच्या लढाईत उतरले. बीडच्या आमदाराची आणि गडकरींची ओळखही नसेल. तर म्हणे आम्ही पैसा आणला.ज्यांची सत्ता त्यांचा पैसा हे समीकरण सर्वांना माहित असतं. राज्य सरकारचा निधी जो बीड जिल्ह्यात येत आहे त्याचं श्रेय हेच सत्ताधिकारी खासदारांना देतील का?

पंकजाताई असो किंवा प्रितमताई यांनी बीड जिल्ह्याच्या राजकारणात विकासाशिवाय राजकारण केलेलंच नाही. पंकजाताई पाच वर्षे पालकमंत्री म्हणुन काम करताना जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवुन विकासाची महाचळवळ उभा केली. दिवसाला दहा कोटी याप्रमाणे पाच वर्षात सरासरी विकासकामाचा निधी जिल्ह्यात आला. तोंड बघुन विकास कधीच केला नाही. शिवाय माझा जिल्हा-माझी माणसं हे तत्व डोळ्यासमोर ठेवत सामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्याचं काम केलं. सुडाचं राजकारण केलं नाही. कुणाचा द्वेष केला नाही. पाच वर्षात एकाही पोलीस ठाण्याला पालकमंत्र्याचा फोन नाही असा आदर्श पालकमंत्री बीड जिल्ह्यात कधी झाला नाही. अविस्मरणीय कारकीर्द पंकजाताईची राहिली. म्हणुन सामान्य माणुस आजही त्यांच्यावर प्रेम करतो. 2515 चा निधी देताना माझा जिल्हा-माझी माणसं एवढं स्ाुत्र डोळ्यासमोर ठेवलं. ना भेदभाव ना हेवेदावे. बीड जिल्ह्यात रेल्वे यावी गोपीनाथराव मुंडेंचं हे स्वप्न होतं. साहेबांनंतर प्रितमताईच्या खांद्यावर जबाबदारी पडली. पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली नगर-बीड-परळी रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला. पाच वर्षे राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना रेल्वेच्या कामासाठी सरकारचा अर्धा वाटा मिळाला. दुसरी उपलब्धी म्हणजे बारा राष्ट्रीय महामार्ग प्रितमताईच्या अथक प्रयत्नातुन बीड जिल्ह्यातुन घेण्यात आले. मेहकर-पंढरपुर असेल किंवा अहमदपुर-केज-जामखेड-नगर असेल हे रस्ते जिल्ह्यात कधी आले असते का?हा प्रश्न मनाला विचारला तर निश्चित नाही असं उत्तर मिळेल. विकास काय असतो? तो मुंडे भगिनीमुळे बीड जिल्ह्यातील जनतेला माहिती झालेला आहे. राज्यात सत्तांतर होवुन दिड वर्षे झालं तरी बीड जिल्ह्यातील पंकजाताईच्या काळात मंजुर झालेले कामे आणि आर्थिक तरत्ाुद आज पुढे आलेली दिसते. मागच्या आठ दिवसापासुन जिल्ह्याचं राजकारण विकासाच्या निधीवरून गाजत आहे. कोरोनासारखा संकटाचा भाग बाजुला ठेवुन सत्ताधारी श्रेयासाठी पुढे येताना दिसतात. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी एका दणक्यात बीड जिल्ह्याला यंदा मोठ्या प्रमाणावर निधी दिला. परळी बायपास रस्ता अंदाजपत्रक तयार करण्यापासुन पंकजाताईंनी त्यावर सत्तेत असताना घातलेलं लक्ष त्याची प्रचिती आज पहायला मिळत आहे. परळी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गासाठी 244 कोटी आले. बीड शहरातील रस्ते आणि इतर रस्ते कोट्यावधी रूपये निधी आलेला आहे. खा. प्रितमताईंचा स्वभाव गप्प बसणे मुळीच नाही. विकासाच्या प्रश्नाशिवाय दुसरीकडे लक्ष नाही. या कामाचा पाठपुरावा सतत केला.मंत्री नितीन गडकरी यांची स्वत: भेट घेतली. केंद्रात सत्ता असल्याचा फायदा राज्यात सत्ता नसली त्यापेक्षा अधिक मिळण्याचं कारण जिल्ह्याच्य्ाा खासदार भाजपाच्या आहेत. त्यापेक्षा अधिक मुंडे भगिनीचं एक पत्र गडकरींना वाटेल तेवढा निधी देण्यासाठी पुरेसं. पण खासदारांनी प्रत्यक्ष भेट घेतली. ज्यानंतर गडकरी साहेबांनी वरील सर्व कामासाठी निधी मंजुर केला. प्रश्न गडकरींनी दिलेला निधी आणि राज्यातील सत्ताधारी व बीड जिल्ह्यातील भाजपा विरोधक घेतात कसे?हेच मुळात हास्यास्पद आहे. यांचा संबंध काय? आज राज्य सरकारने एक हजार रूपायाचा निधी दिला तरी त्याचे श्रेय सत्ताधाऱ्यांना जावु शकते. तसं केंद्राचा एक रूपाया आला तरी श्रेय भाजपालाच जावु शकते. पण राजकारणात काम करताना श्रेय घेण्याची चढाओढ लोकांना दिसत असली तरी केंद्रात सरकार कुणाचं?आणि जिल्ह्यात खासदार कोण?एवढा सरळ हिशोब बीड जिल्ह्यातील माय-बाप जनतेला समजणार नाही एवढी दुधखुळी जनता आहे का? राजकारणात आपआपल्या मतदारसंघात जनमाणसांत आपलं नेतृत्व रूज्ावण्यासाठी वेगवेगळी नाटकं करावी लागतात तो भाग वेगळा. पण अशा प्रकारची श्रेयवादाची लढाई आणि त्याच्यातलं सत्य-असत्य हा राजकिय हिशोब मात्र जनतेला चांगला माहित असतो. फरक एवढाच आहे की मुंडे भगिनीचं कर्तृत्व आणि सेवाभाव सामान्य जनतेला समर्पित असतो. त्यामुळे कितीही पैसा आणला तरी श्रेयाच्या भानगडीत कधीच पडत नाहीत. पंकजाताईनं एवढा निधी आणुन श्रेय घेण्याची चढाओढ त्यांनी केली नाही. मात्र आज जिल्ह्याच्या राजकारणात भाजप विरोधक केंद्रातुन आलेल्या निधीचा उदो उदो करू लागले. विकासाचा शिमगा साजरा करताना जनतेच्या समाधानासाठी रंगाचा बेरंग करू लागले. पंकजाताईनं पाच वर्षात बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना नाही म्हटलं तरी 900 कोटीचा विमा मंजुर केला आणि आज दमडी विमा मिळेना. राज्य सरकारनं अतिवृष्टीचा पैसा शेतकऱ्यांना दिलेला नाही. मागच्या महिन्यात वादळाने खरीप हंगाम धोक्यात आला त्याचा पैसा नाही आणि केंद्रातुन आलेल्या निधीवर डोळा ठेवत आम्ही मंजुर केला.खरं म्हणजे अगदी प्राथमिक शाळेतील मुलांच्या भांडणाप्रमाणे भाजप विरोधी सत्ताधारी श्रेयवादाच्या लढाई करताना दिसत आहेत. ज्या खासदारांनी सत्तर वर्षाची मागणी अर्थात रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला त्या खासदार आजही माझ्यामुळे रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला असं म्हणायला तयार नाहीत. कारण भाजप संस्कृतीप्रमाणे सेवाभाव, समर्पण आणि त्याग यातुन त्यांची वृत्ती दिसुन येते. अर्थात स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे खासदार चालवतात तो भाग वेगळा.

-दखल राम कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published.